मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आमदार आशुतोष काळे यांनी एका प्रलंबित प्रश्नी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. तालुक्यातील पोलिस इमारत व पोलिसांचे निवासस्थान याच्या निविदा निघाल्या आहेत. ही प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागावी जेणेकरून पोलिसांना तातडीने त्यांची निवासस्थान मिळतील अशी मागणी यावेळी आमदार काळे यांनी विधानसभेत गृहमंत्र्यांना केली आहे. आगामी काळात […]
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांवर टीका करत असताना विधानसभेत चोरमंडळ बसले आहे, असे जाहीर भाषणात म्हटल्याने प्रचंड गदारोळ झाला होता. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग समिती स्थापन केली. या समितीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील १५ आमदारांची नेमणूक केली. या समितीने संजय राऊत यांना हक्कभंग नोटीस बजावत उत्तर द्यायला सांगितले. मात्र, […]
गेले काही दिवसांपासून सुरु असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेतला आहे. आज मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आज संप मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन मागणीसाठी आंदोलन सुरु केले होते. त्यावर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीचा गंभीरपणे विचार करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय […]
एकेकाळी राष्ट्रवादीचा गड मानला जाणारा सोलापूर जिल्हा आता भाजपच्या ताब्यात गेला आहे. पण अजूनही आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत. अगदी दहा वर्षापर्यंत राष्ट्रवादीचा गड मानला जाणारा सोलापूर जिल्हा आता जवळपास भाजपच्या ताब्यात गेला आहे. त्यातही उरले-सुरले काही नेतेही भाजपच्याच संपर्कात आहेत. त्यामुळे एकंदरीत अवघड परिस्थिती असलेल्या सोलापुरात राष्ट्रवादीला अजूनही काही धक्के बसण्याची शक्यता वर्तवली […]
सातारा : साताऱ्यात किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव गेला, ही काय मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल करत राज्यातल्या कायदा-सुवव्यस्थेच्या प्रश्नी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले आहेत. टाटा समूहाने Bisleri खरेदी करण्यास नकार; जयंती चौहान स्वीकारणार ‘या’ कंपनीची जबाबदारी पवार म्हणाले, १५ मार्च रोजी ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्या मुलाच्या वाहनाचा […]
मुंबई : राज्यात खुलेआम देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचे काम सुरू आहे. हे केवळ कोणत्या एका देवस्थानबद्दल बोलत नाही. तर राज्यभरातील देवस्थानच्या जमिनीबद्दल सांगत आहे. विशेषतः गेल्या चार-पाच वर्षात हे प्रकार सुरू आहे. म्हसवड, त्रिंबकेश्वर, विटा (सांगली), बीड जिल्ह्यातील खर्डा येथील विठोबा देवस्थानच्या मालकीची जमिनी देवस्थानला इनामी दिल्या आहेत. सातबारावर देवस्थानच्या जमिनी केल्या गेल्या आहेत. तरीही […]