बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावातील तब्ब्ल २०० जावई हे भूमिगत झाल्याचे समोर आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. बीड जिल्ह्यातील विडा येथे निजामाच्या काळापासून एक अनोखी परंपरा जोपसली जात आहे. त्यात धुलिवंदनाच्या दिवशी जावई बापूंची गाढवावरून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंगळवारी (दि. ७) रोजी धुलिवंदन असल्याने जवळपास २०० जावई हे भूमिगत […]
संभाजीनगर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर वाद थांबायचे काही नाव घेईना. रोज आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच एमआयएमचे खासदार यांनी या नामांतराविरोधात उपोषण सुरु केले आहे. त्यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आंदोलनादरम्यान औरंगजेब यांचे फोटो उंचावल्याने इम्तियाज जलील (Imtiyaj Jalil) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या आरोपांना प्रतिउत्तर देताना इम्तियाज जलील यांनी म्हटले की, […]
अहमदनगर : आजच्या शिमग्याच्या दिवशीच अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील काही भागांत सायंकाळी प्रचंड गारपिटीसह झालेल्या पावसाने झोडपून काढले आहे. गारपीटीनंतर तालुक्यातील शेतशिवारासह रस्ते बर्फाच्छादित झाले आहेत. तालुक्यात अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोंगणीला आलेलं पिक गारपीटीमुळे आडवे झाले आहे. अचानक प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपीटीने सोंगणीला आलेल्या पिकांचे नूकसान झालंय. यामध्ये […]
अहमदनगर : क्षेत्र मढी येथे शेकडो वर्षाची परंपरा असलेली गोपाळ समाजाची मानाच्या होळी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पेटली. पोलिसांना चकवा देत गडाकडे जाणारा पारंपारिक मार्ग मानकऱ्यांनी अचानक बदलल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत मूळ मार्गाकडे वळवले. त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली. होळी पेटल्यानंतर एक तासाने दोन गटात हाणामारी होऊन एका गटाने दुसऱ्या गटावर अचानक हल्ला केला. पोलिसांनी […]
मुंबई : आजचा होळीचा चांगला दिवस आहे, चांगलं काहीतरी बोला, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत विचारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राऊत यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी यंदा पहिल्यांदाच होळी साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होलिका मातेचे […]
अहमदनगर : कानिफनाथ महाराज की जय,असा जयघोष करत कैकाडी समाजाची मानाची काठी कळसाला व समाधीला भेटून श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांचा यात्रा उत्सवाची आजपासून सुरुवात झाली. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा चालते. धार्मिक परंपरेनुसार वारी रविवारी (ता.५) रात्री पाथर्डी शहरातून वाजतगाजत मानाच्या काठीची मिरवणूक निघाली. डफांचा पारंपारिक तालात मिरवणूक’ रात्रभर मिरवत सकाळी मढीला आली. ग्रामप्रदक्षिणा […]