काल तुम्ही जो महाराष्ट्राच्या जनतेसमोर तमाशा केला, त्याच व्याजासकट उत्तर येत्या १९ तारखेला मिळेल, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये सभा घेतली, त्याला उत्तर देण्यासाठी रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. योगेश कदम यांचा जो अपघात झाला त्याची अजून चौकशी […]
“लोक आम्हाला म्हणते गद्दारी का केली, आम्ही काही गद्दारी केली नाही. आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे” असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात बच्चू कडू यांच्या महत्वकांक्षेची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच […]
नांदेड : आजची देशातील परिस्थिती पाहिली तर दररोज वातावरण बदलत चाललं आहे. कोणी मोकळ्यापणाने बोलू शकत नाही. सरकारचे गुणगाण केलं तर सगळं चांगलं आहे. सत्कार केला जाईल, सन्मान केला जाईल पण सरकारच्या विरोधात जर तुम्ही बोललात तर काही खरं नाही. आणीबाणीच्या (Emergency) काळात देखील असं घडलं नाही ते आता घडत आहे, अशी टीका काँग्रेस नेते […]
नाशिक : शेतकरी, सामान्य वर्ग आजही प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा बळी ठरताना दिसतोय. त्यातच आता नाशिक (Nashik) जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्र्यंबकेश्वर (Trimabkeshwer) तालुक्यातील अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात (Anjaneri Primary Health Center) प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची डॉक्टर नसल्यानं स्वतःच्या आईनेच प्रसूती केल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी (Anjneri) येथील प्राथमिक आरोग्य […]
लातूर : भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांना सर्वश्रुत आहे. काही दिवसांवर आलेल्या लातूर (Latur) महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप आणि काँग्रेसने कंबर कसलीय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्यावर […]
बुलढाणा : बारावी पेपरफुटी प्रकरणी (HSC Paper Leak Case) पोलिसांनी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. दोघेही बुलढाण्यातील (Buldhana) लोणार तालुक्यातील (Lonar) खाजगी शाळेवरील शिक्षक असल्याची माहिती समजतेय. आत्तापर्यंत पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या सातवर पोहोचलीय. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. शकील शे. मुनाफ (रा. लोणार) आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण (रा. सावरगाव-तेली, ता. लोणार) अशी त्या […]