अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृत सागर दूध संघाची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला धूळ चारत माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनलने विजय मिळविला. त्यांच्या पॅनलने 15 पैकी 13 जागांवर विजय मिळविला. मागील वर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना व राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना चाळीस वर्षांची सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे अमृत सागर […]
पुणे : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये अशोकपर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अशोक सराफ यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेमध्ये असती, तर ते आज मुख्यमंत्री असते. ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या मांजरधाव प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने स्वतःच्या जागेवर डमी शिक्षकाची नेमणूक केल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. विशेष म्हणजे दोन वर्ष हा प्रकार सुरू असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येतंय. जिल्हा परिषदेचे शिक्षक बाजीराव पानमंद यांनी आपल्या जागी एक खासगी बेरोजगार युवक कुलदीप जाधव याला शाळेत पाठवून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नेमणूक केली. ग्रामस्थांनी […]
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. महाराष्ट्रात सध्या जे सुरु आहे, त्याला राजकारण म्हणता येणार नाही. महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्यं केली जात आहेत. महाराष्ट्रात एवढे मोठे प्रश्न असताना नुसतीच निष्फळ बडबड केली जात आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहेत. कोणी कशावरही बोलायला लागलंय. कोणीही इतिहास तज्ज्ञ होताहेत. कारण हे सगळं टीव्हीवर दाखवलं जातंय, अशी […]
कोल्हापूर : संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलाय, त्यात बहुमताला प्राधान्य देण्यात आलंय. काही गावांत सरपंच एका विचाराचा आणि सदस्य बॉडी एका विचाराची असते. त्यामुळं ग्रामपंचायतीचा खेळखंडोबा होतो. सध्या सोयीचं राजकारण सुरु आहे. जर सरपंचाची निवड थेट जनतेतून करताय तर सभापती, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष अगदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवडही जनतेतूनच व्हायला हवी, असं स्पष्ट मत […]
लातूर : जन्मादात्या आईनेच तीन महिन्याच्या मुलीचा गळा घोटल्याची घटना संतापजनक घटना लातूर जिल्ह्यात घडलीय. या महिलेला पहिली मुलगी होती, दुसऱ्यांदाही तिला मुलगी झाल्याने तिने तीन महिन्याच्या बाळाची गळा दाबून हत्या केलीय. या प्रकरणी निर्दयी आईविरोधात गातेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? रेखा किसन चव्हाण असं या निर्दयी आईचं नाव […]