मुंबईत दहीहांडी उत्सवाला गोलबोट! उंचावर थर रचताना 41 गोविंदा जखमी…

मुंबईत दहीहांडी उत्सवाला गोलबोट! उंचावर थर रचताना 41 गोविंदा जखमी…

Dahi Handi festival : भगवान श्रीकृष्ण जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यातील इतर भागांत दहीहंडी उत्सव (Mumbai Dahihandi Festival) मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जात आहे. दहीहांडी उत्सवाला गोलबोट लागल्याचं समोर आलं आहे. मुंबईत दहीहांडी उत्सवात तब्बल 41 गोविंदा जखमी झाल्याचं समोर आलंय. जखमी गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. यांसदर्भातील माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलीयं.

राज्यभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात दहीहांडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. दहीहांडी उत्सवात थरावर थर रचताना गोविंदा जखमी होतात. त्यामुळे या उत्सवाला गोलबोट लागत असल्याचं दिसून येत आहे. जखमी गोविदांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून 41 पैकी 34 गोविंदांना उपचार करुन घरी सोडण्यात आलंय. तर 7 जखमी गोविंदांवर उपचार सुरु आहेत.

कोलकाता बलात्कार अन् खून प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपीने वापरलेली गाडी पोलीस आयुक्ताच्या नावावर

दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात. या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. मागील दोन वर्षांत जखमी गोविंदांची संख्या 200 वर पोहचली आहे. तरुण गोविंदा मोठ्या प्रमाणात जखमी होत असल्याने व त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारच्या तसेच महानगरपालिकेची केईएम, शीव, नायर व कूपर ही रुग्णालये सज्ज झाली आहेत.

..अखेर तरुणाने संपवलं जीवन; मित्रानेच मित्राचा केला घात; कॅफे उघडण्यासाठी घेतले होते ‘इतके’ पैसे

दरम्यान, मुंबईत दादरमधील आयडिअल, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी या ठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळत आहे. तसेच यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या उभारण्यात आल्या आहेत. यावेळी लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या