पुणे : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज (ता.16 जानेवारी) जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. यावेळी त्यांनी विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली. ‘जागतिक भरड धान्य वर्ष- २०२३’ च्या निमित्ताने अधिक पौष्टिक तत्वे असलेले बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचे महत्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. […]
मुंबई : महानगरात यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय. भारतीय हवामान विभागानुसार, मुंबईत आज सकाळी पारा 13.8 अंशावर पोहोचला. हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निच्चांकी तापमान आहे. मुंबईत 15 ते 17 जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं गेल्या आठवड्यामध्ये वर्तवलाय. त्यानुसार, मुंबईतील तापमानात कमालीची घट झाली आहे. मुंबईत रविवारी दिवसाच्या कमाल तापमानामध्येही […]
बारामती : “तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जायला निघालो पण मध्येच वीज गेली अन् चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही संकेद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती,” असा जीवघेणा अनुभव विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितला. ते बारामतीत बोलत होते. […]
पुणे : आजपासून म्हणजेच दि. 16 व 17 जानेवारी रोजी आयोजित जी-20 बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे 38 प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आगमन झाले. रविवारी आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-20 समुहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि […]
मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी रवाना झाले आहेत. या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध उद्योग तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. “या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक व्हावी, यासाठी संपूर्णपणे प्रयत्नशील राहीन.” अशा शब्दात ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
पुणे : चंद्रकांत पाटील हे शक्तिमान गृहस्थ आहेत. ते कोल्हापूरवरून कोथरूडला आले आहेत. त्यांचं कोथरूडसाठी काय योगदान आहे हे कोथरूडकरांना विचारलेलं बरं, ज्यांची आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातून निवडून येण्याची क्षमता नाही त्यांच्याबद्दल काय बोलावं, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं. त्यांनी आज महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या शिवराज राक्षे यांचा आपल्या घरी […]