उद्धव ठाकरेंचा रिमोट कंट्रोल कॉंग्रेसच्या हातात, PM मोदींंनी शेवटच्या सभेत घेरलं…

  • Written By: Published:
उद्धव ठाकरेंचा रिमोट कंट्रोल कॉंग्रेसच्या हातात, PM मोदींंनी शेवटच्या सभेत घेरलं…

Narendra Modi : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैऱी झडत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) महाराष्ट्रातील शेवटच्या प्रचार सभेत बोलतांना महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला, अशी टीका मोदींनी केली. यावेळी त्यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला.

कॉंग्रेस एससी, एसटींच आरक्षण हिरावणार, राजपुत्राच्या तोंडी विध्वंसाची भाषा…; PM मोदींचा राहुल गांधींवर निशाणा 

शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज झाली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील या निवडणुकीसाठी आज माझी शेवटची प्रचार सभा आहे. दरम्यान मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या प्रत्येक भागातील लोकांशी संवाद साधला. सर्वत्र एकच आवाज ऐकू येत आहे, तो म्हणजे भाजप, महायुती आहे तर गती आहे.

शिर्डीत जे.पी. नड्डांच्या सभेसाठी अभूतपूर्व मोटारसायकल रॅली; राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांचा शक्तिप्रदर्शन 

राजपुत्राच्या तोंडी विध्वंसाची भाषा…
यावेळी मोदींनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, मुंबई जोडण्याची महायुतीची भूमिका आहे. तर महाविकास आघाडी मात्र तोडण्याची भाषा करत आहे. कॉंग्रेसचे राजपुत्र देशात विध्वंसाची भाषा करत आहेत. मविआवाले जातीवरून लढतात. कॉंग्रेस एससी, एसटींचे आरक्षण हिरावणार आहे, असं म्हणत भाजप आणि महायुतीचं सेवाभावाने काम करू शकते. भाजपचा एक है, तो सेफ है, हा अजेंडा आहे, असं मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, महायुती आहे तर गती आहे. आमच्यासोबत म्हणजे महायुतीसोबत संपूर्ण महाराष्ट्राचा आशिर्वाद आहे. एका बाजूला महाराष्ट्रात महायुतीची विचारधारा आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे विचार आहे, जे महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. महाविकास आघाडीचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम झाले आहेत. ही आघाडी आहे, जी राम मंदिराचा विरोध करते, जे मतांसाठी भगवा आतंकवाद असा शब्द आणतात. ही आघाडी कायम सावकरांचा अवमान करते. काश्मीरमध्ये कलम 370 च्या वापसीसाठी प्रस्ताव मंजूर करते, असं म्हणत मोदींनी मविआवर टीका केली.

यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला, अशी टीका मोदींनी केली. ते म्हणाले, काँग्रेस सरकार बनवण्यासाठी तडफडत आहे, पाण्यावाचून मासे तडफडतात, तसे एटी, ओबीसीची एकजूट तोडू पाहत आहे. कॉंग्रेस एसटी-एससी ओबीसींचे आरक्षण संपवणार आहे, असं मोदी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube