अजितदादा गटाच्या बैठकीत काय झालं? तटकरे म्हणाले, ‘महायुतीची एकत्रित…’

  • Written By: Published:
अजितदादा गटाच्या बैठकीत काय झालं? तटकरे म्हणाले, ‘महायुतीची एकत्रित…’

Sunil Tatkare : आगामी वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. अशातच आज अजित पवार गटाची (Ajit Pawar) पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांनी अनेक विषयावर भाष्य केलं. बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती तटकरेंनी दिली.

‘खरगे-फरगेंना ओळखत नाही नितीश कुमारच..,’; इंडिया आघाडीत जेडीयूच्या आमदाराचा मिठाचा खडा! 

तटकरे म्हणाले, राज्यातील घटक पक्ष म्हणून एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची एकत्रित सभा आयोजित करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय 7 जानेवारी 2024 रोजी षण्मुकानंद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 12 जानेवारी 2024 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहितीही तटकरे यांनी दिली.

पवार कुटुंबात मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो : अजित पवारांनी ठणकावून सांगितले 

ते म्हणाले, आजची बैठक ही आगामी निवडणुकीसंदर्भात होती. या बैठकीत कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा करून पक्षाच्या पुढील रणनीती आणि वाटचालीद्दल मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अजित पवारांनी
पक्षातील विविध पदांवरील नियुक्त्या, बुथ कमिटीच्या नियुक्त्या आणि जिल्ह्याला दिलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती घेतली. आगामी काळात महिला, विद्यार्थी, युवतींसाटी मेळावे घेणार आहोत, असंही तटकरे यांनी सांगितलं.

पक्ष चिन्हाच्या वादावर बोलतांना तटकरे यांनी सांगिलते की, एनडीएचा घटक पक्ष म्हणून महायुतीच्या सोबत निवडणूक लढवत असतांना निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, असं सांगितलं.

कुठेही मॅचफिक्सिंग नाही – अजित पवार
भेटीगाठी कौटुंबिक असून कुठेही मॅचफिक्सिंग नाही. जे आमच्यासोबत आले आहेत त्यांचा विश्वासघात आम्ही करणार नाही. माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही, हे स्टॅम्पपेपरवर लिहून देतो. मार्च महिन्यात आचार संहिता लागणार आहे. त्यासाठी संघटनात्मक कामे करा. धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचार हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे, असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रातून एनडीएच्या जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे, असंही ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube