मोठी बातमी! बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले ! जोरदार घोषणाबाजीसह धक्काबुक्की
Thackerey Vs Shinde : गेल्या तासाभरासपासून शिवाजी पार्कवर जोरदार राडा सुरू आहे. हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळाला आज रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली. यावेळी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी तेथे आले. मुख्यमंत्री शिंदे स्मृतिस्थळाला भेट देऊन गेल्यानंतर शिवाजी पार्कवर दोन्ही गट आमने-सामने आल्यानं मोठा वाद निर्माण झाला.
World Cup 2023 : अटीतटीच्या सामन्यात आफ्रिका पराभूत; वर्ल्डकपसाठी भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार !
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या 11 वा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राज्यभरातून शिवसैनिक दर्शनासाठी येतात. आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहीली. त्यावेळी तेथे हजर असलेले ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आक्रमक झाले. मुख्यमंत्री शिंदे तेथून बाहेर पडल्यानंतर आणखी काही ठाकरे गटाचे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. विशेष म्हणजे ठाकरे गटाते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्यासह ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते शिवाजी पार्कवर आले होते. त्यांनी स्मारकाच्या ठिकाणी शु्ध्दीकरण केल्याचं बोलल्या जात आहे. यावरून दोन्ही गटात राडा झाला.
Maratha Reservation: तुम्ही एक भुजबळ पाडाल, तर आम्ही 160 आमदार पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा
यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि शीतल म्हात्रे देखील समाधीस्थळी हजर होते. त्यांच्यासोबतही शेकडो कार्यकर्ते हजर होते. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आले. त्यामुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की करण्यात आली. गद्दारांना हाकलून द्या, अशी घोषणा दिल्या गेल्या. यावरून परिस्थिती चांगलीच चिघळली होती. या घटनेचे व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत. सध्या याठिकाणी प्रचंड गर्दी झाली असून तणावाचं वातावरण आहे. सध्या मोठी पोलीस फौजही शिवाजी पार्कवर आहे.
या राड्यानंतर अनिल देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्या आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतिदिन आहे. हा स्मृतीदिन आम्ही शांततेनं साजरा करू. बाकीचे तमाशे करण्याच्या प्रयत्नात आहेत. कुणीही इथं विघ्न आणण्यचाा प्रयत्न केला तर आम्ही विघ्न येऊ देणार नाही, सच्चे शिवसैनिक कधीच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर विघ्न आणणार नाहीत बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार ज्यांना माहित आहेत. ते कुणीही येथे कोणीही येथे अनर्थ करणार नाहीत, असंही देसाई म्हणाले.
तर नरेश म्हस्के यांनी म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या समाधी स्थळावर महिलांना धक्काबुक्की करण्यात आली. हे अस्वीकार्य आहे, आम्ही स्वतंत्र भारतात राहतो. ही जागा त्यांच्या बापांची नाही, असं म्हस्के म्हणाले.
भीतीपोटी ते कोणत्याही थराला
बाळासाहेबांच्या सृतीदिनी कोणताही वाद नको, गालबोट लागायला नको म्हणून सामंजसपणाची भूमिका घेत मुख्यमंत्री पूर्वसंध्येला दर्शन घ्यायला जातात. त्यामुळे आज ठाकरे गटाने तिथे दाखल होऊन वाद घालण्याची कोणतीही गरज नव्हती.परंतु, बाळासाहेबांना आपण गमावलंय या भीतीपोटी ते कोणत्याही थराला जात आहे.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंब्य्रातील ठाकरे गटाची शाखा तोडल्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वतः मुंब्र्यात पोहोचले होते. मात्र शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. परिणामी, उद्धव ठाकरेंना माघारी फिरावं लागलं होत. यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे हे शिवाजी पार्कवर आल्यानं ठाकरे गटाच्या कार्यकर्ते त्यांना विरोध करण्यासाठी एकत्र आले होते, असं सांगितल्या जात आहे.