Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठापनेआधीच शंकराचार्य मोदींवर नाराज; नेमकं कारण काय?
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामलल्लांचा (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात फक्त पाच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) हस्ते रामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती (Shankaracharya Nishchlanand Sarswati) यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यालाही जाणार नसल्याची घोषणा शंकराचार्यांनी केली आहे.
‘तत्त्व अन् सत्त्व न बदल्याने निधी मिळण्यास अडचणी’; कोल्हेंची सत्ताधाऱ्यांवर सडेतोड टीका
देशभरात सध्या राम मंदिर सोहळ्यासाठीच भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. देशातील विविध ठिकाणी राम मंदिर सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण दिवाळी सणासारखाच साजरा करण्यात यावा, असं आवाहन भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरात येत्या 22 जानेवाारीला दिवे लावून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेत.
Houthi Attacks : हुती बंडखोरांची घटका भरली; अमेरिकेचा अखेरचा इशारा, सैन्यही अलर्ट
एकीकडे ऐतिहासिक सोहळ्यासाठी उत्साहाचं वातावरण सुरु असतानाच आता शंकराचाऱ्यांनी थेट मोदींवरच नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावर बोलताना शंकराचार्य म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराचा लोकार्पण करणार आहेत, प्राणप्रतिष्ठेदरम्यान मोदी मूर्तीला स्पर्श करतील आणि मी जयजयकार करीत टाळ्या वाजवत बसू का? या शब्दांत शंकराचार्य निश्चलानंद यांनी संताप व्यक्त केला आहे.
‘आमच्या गाड्या रोखाल तर तुमचं दूध, भाजीपाला बंद करू’, जरागेंचा राज्य सरकारला इशारा
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शंकराचार्य निश्चलानंद यांनी सडकून टीकाही केल्याचं पाहायला मिळालं आहे. पंतप्रधा नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी योगासने करतात, त्यांच्याकडून धार्मिक क्षेत्रातही हस्तक्षेप होत असल्याची टीका शंकराचार्यांनी केली आहे. येत्या 22 जानेवारील अयोध्येला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
‘शिंदेंनी मला स्वत: सांगितलं पण अजितदादांनी माझं पालकमंत्री पद…’ गौप्यस्फोट करत आव्हाडांचा आरोप
अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाला आता काहीच दिवस शिल्लक असून, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराम विराजमान होणार आहेत. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तीन कारागीरांनी रामलल्लांच्या वेगवेगळ्या मूर्ती बनवल्या आहेत. येत्या 22 तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंदिराच लोकार्पण करण्यात येणार आहे. अशातच आता शंकराचार्यांनी नाराजी व्यक्त केल्याने पंतप्रधान मोदी काय भूमिका घेणार? याकंड देशाचं लक्ष लागलं आहे.