धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी; बांग्लादेशी कुटुंब सापडल्याने BSF अलर्ट

धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी; बांग्लादेशी कुटुंब सापडल्याने BSF अलर्ट

Bangladesh Crisis : बांग्लादेशातील हिंसाचार अजून थांबलेला (Bangladesh Crisis) नाही. देशात हिंसाचाराची धग कायम आहे. नागरिक भयभीत झाले असून देशातून पलायन सुरू झाले आहे. याचा त्रास भारताला होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अखेर ही भीती खरी ठरू लागली आहे. बांग्लादेशी नागरिकांडून भारतात घुसण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेनुसार असा एक प्रकार पश्चिम बंगालमध्ये (West Indies) उघडकीस आला आहे. सीमा शुल्क विभाग आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांना याबाबतीत अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Bangladesh Protests : मोठी बातमी! बांग्लादेशात स्थापन होणार अंतरिम सरकार, गुरुवारी शपथविधी

सीमा सुरक्षा दलाला आधीच काही बांग्लादेशी नागरिकांची यादी देण्यात आली आहे. हे लोक भारतात घुसखोरी करू शकतात अशी माहिती देण्यात आली आहे. या लोकांची यादी राज्यातील विविध ठिकाणी तैनात असणाऱ्या बीएसएफच्या तुकड्यांनाही देण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका बांग्लादेशी कुटुंबाला भारतात प्रवेश करताना मंगळवारी सायंकाळी पकडण्यात आले. या जोडप्याकडे बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड आढळून आले होते. यानंतर बीएसएफला हाय अलर्ट देण्यात आला.

चौकशीनंतर गुन्हा केला मान्य

या कुंटुंबाची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांनी मान्य केले की बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले. मुलांना चांगल्या आरोग्य सुविधा आणि उपचार मिळावेत हा हेतू यामागे होता असे उत्तर या कुटुंबाने चौकशी दरम्यान दिले. बांग्लादेशातील रंगपूर येथे राहणारे दोन व्यक्ती इनामुल हक सोहेल आणि संजीदा जीनत इलाही यांच्याकडे चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या. नंतर त्यांची रवानगी पुन्हा बांग्लादेशात करण्यात आली.

हिंमत असेल तर बांग्लादेशातील हिंदूंवरील हल्ले रोखा; ठाकरेंचं मोदी-शहांना ओपन चॅलेंज !

दरम्यान, भारतासाठी आता कठीण काळ सुरू झाला आहे. शेख हसीना यांनी सत्ता सोडल्याने आता बांग्लादेशात त्या सर्व गोष्टी होतील ज्या चीन आणि पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरतील. देशातील कोणत्याही प्रकल्पात भारताचा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे आगामी काळात व्यापारी, राजकीय आणि सामरिक या सगळ्या आघाड्यांवर भारताला अधिक सावध राहावे लागणार आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात सन २००९ पासून दोन्ही देशांत ज्या सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या थांबतील. या काळात भारतात घुसखोरी करण्याचे प्रमाणही वाढणार आहे. याचा सर्वाधिक फटका बांग्लादेशला लागून असलेल्या राज्यांना बसणार आहे.

या घुसखोरीमुळे येथील जनसांख्यिकी बदलण्याचाही धोका आहे. आसाम आणि पश्चिम बंगाल (West Bengal) या संकटाला तर सातत्याने तोंड देत आहेत. अशा परिस्थितीत येथील स्थानिक जनतेलाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय सैनिकांना (Indian Army) अगदी डोळ्यांत तेल घालून देशाच्या सीमेवर पहारा द्यावा लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube