Video : बिहारमध्ये ‘फिर एकबार ‘NDA’ सरकार, गठबंधनचा सुपडासाफ, पंतप्रधान काय म्हणाले?

हा मोठा विजय देत आणि अतूट विश्वास व्यक्त करत बिहारच्या लोकांनी धुरळाच उडवून दिला आहे. आज बिहारच्या घराघरात मखानेची खीर होणार आहे.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 14T200044.256

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून महायुतीला (NDA) मोठ यश मिळालं असून महागठबंधनचा सुपडासाफ झाला आहे. सुमारे 202 जांगाचं बंपर बहुमत भाजप जदयु महायुतीला मिळालं असून महागठबंधन 50 आत आलं आहे. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भाजप कार्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.

एक म्हण आहे, लोहा लोहे को काटता है. बिहारमध्ये लांगूलचालन करणारा my फॉर्म्युला केला होता. पण आजच्या विजयाने नवीन सकारात्मक एमवाय माय फॉर्म्युला दिला आहे. तो आहे महिला आणि युथ. आज बिहार देशाच्या ज्या राज्यांमध्ये आहे, जिथे सर्वाधिक तरुणांची संख्या आहे. त्यात प्रत्येक जात आणि धर्माचे लोक आहेत. त्यांची इच्छा आहे. त्यांची आकांक्षा आहे. त्यांच्या स्वप्नांनी जंगलराजवाल्यांच्या सांप्रदायिक माय फॉर्म्युल्याला उद्ध्वस्त केलं आहे. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्री मोदींनी शुभेच्छा देत अभिनंदन केलं आहे.

Bihar Election Result 2025 : सुशासन, विकास, सामाजिक न्याय जिंकलाय-नरेंद्र मोदी

हा मोठा विजय देत आणि अतूट विश्वास व्यक्त करत बिहारच्या लोकांनी धुरळाच उडवून दिला आहे. आज बिहारच्या घराघरात मखानेची खीर होणार आहे. मला आनंद याचा आहे की, या ठिकाणीही मखान्याची खीर सर्वांना देण्यात आली आहे. आम्ही तर जनता जनार्दनाचे सेवक आहोत. आम्ही आपल्या मेहनतीने जनतेचं हृदय खूश करत असतो. आम्ही तर जनता जनार्दनाचं हृदय चोरून बसलेलो आहोत. त्यामुळे संपूर्ण बिहारने दाखवून दिलंय की पुन्हा एकवार एनडीए सरकार. फिर एकबार एनडीए सरकार.

हा विजय ज्यांना विकास नको आहे त्यांच्या विरोधातील आहे. तसंच, येथील जंगलराजला वैतागलेल्या लोकांनी विकासाला दिलेली ही साथ आहे असंही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर अनेक वर्ष ज्यांनी देशात आणि राज्यात राज्य केलं त्या लोकांनी बिहारसाठी काही केलं नाही असंही ते म्हणाले आहेत. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाहा यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

follow us