“माझ्यावर कारवाई केल्यास 40 हजार कोटींचा घोटाळा उघड करेल”: भाजप आमदाराची नेतृत्वालाच धमकी
बंगळुरू : माझी पक्षातून हकालपट्टी केल्यास कोविड-19 शिखरावर असताना पक्षाने केलेल्या 40 हजार कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करेन, अशी धमकी भाजपचे (BJP) आमदार बसनगौडा पाटील यत्नल (Basangowda Patil Yatnal) यांनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांना दिली आहे. त्यांच्या या आरोपांनी मोठी खळबळ उडाली आहे. तर “भाजपच्या राजवटीत राज्यात 40 टक्के कमिशनचे सरकार असल्याच्या आपल्या आरोपांचा पुरावा आहे” असे म्हणत सत्ताधारी काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर टीका केली. (BJP MLA Basangowda Patil Yatnal has threatened to expose the 40 thousand crore scam)
Manoj Jarange : मराठा आरक्षण मार्गी लागल्यानंतर राजकारणात येणार का? जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
यत्नल म्हणाले, “ते मला नोटीस देऊन पक्षातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मी त्यांचा पर्दाफाश करीन. भाजप सरकारच्या काळात कोरोना व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. आता माझी पक्षातून हकालपट्टी झाल्यास हा 40 हजार कोटींचा घोटाळा उघड करेन. एका मास्कची किंमत 45 रुपये होते. पण येडियुरप्पा यांनी कोविडच्या काळात एक मास्क 485 रुपयांना विकत घेतले होते. बंगळुरूमध्ये 10,000 बेडची व्यवस्था केली होती. पण हे बेड भाड्याने घेतले होते. ते दररोज 20 हजार रुपये भाडे देत होते.
Prakash Ambedkar : ‘वंचित’ ने जाहीर केला इंडिया आघाडीसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला
मात्र जर ते बेड खरेदीच केले असते तर एकाच्या किंमतीत दोन बेड खरेदी झाले असते. सलाईन स्टँडसह दोन खाटा 20 हजार रुपयांना खरेदी करता आल्या असत्या. याशिवाय भाजप सरकारच्या काळात प्रत्येक रुग्णामागे 8 ते 10 लाख रुपयांचे बिल करण्यात आले. आपले स्वतःचे बिल 5.8 लाख रुपये झाले होते असाही गौप्यस्फोट बसनगौडा पाटील यत्नल यांनी केला. यत्नल यांच्या या आरोपांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. स्वपक्षातूनच असे आरोप झाल्याने भाजपची मोठी पंचायत झाली आहे.
येडियुरप्पा यांचा मुलगाच प्रदेशाध्यक्ष :
बसनगौडा पाटील यत्नल यांनी ज्या येडियुरप्पा यांच्यावर हे आरोप केले त्यांचे चिरंजीवच सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा दुसरा मुलगा बीवाय विजयेंद्र हे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. विजयेंद्र यांनाच खिंडीत गाठण्यासाठी यत्नल यांनी थेट येडियुरप्पा यांना लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने विरोधी पक्षात असताना कोरोना महामारी उपचार आणि नियंत्रणाच्या नावाखाली येडियुरप्पा सरकारने सुमारे 4,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता .मात्र, यत्नल यांच्या आरोपावरून काँग्रेस पक्षाच्या अंदाजापेक्षा दहापट भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे.