काय सांगता! मोदी सरकार सुरू करणार टॅक्सी सर्व्हिस; ओला, उबरला देणार फाईट

Cooperative Taxi Service : तुमच्याकडील मोबाइलमधील अॅप उघडलं आणि पटकन कॅब किंवा ऑटो बूक केली. इतकं सोपं आहे. प्रवासासाठीची ही सुविधा खूप सोपी आहे आणि यात ओला, उबर या ऑनलाइन कॅब बुकिंगचा दबदबा आहे. पण थांबा यात आता मोठा ट्विस्ट आला आहे. ऑनलाइन कॅब बुकिंगची मक्तेदारी लवकरच संपुष्टात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारनेच तयारी केली आहे. ओला (Ola) आणि उबर (Uber) यांच्या धरतीवर सरकार कॅब सर्व्हिस लाँच करणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी संसदेत दिली.
अमित शाह यांनी बुधवारी संसदेत याबाबत माहिती दिली. शाह म्हणाले, आता लवकरच ओला आणि उबर या टॅक्सी सेवेप्रमाणेच एक सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे. ओला आणि उबर यांच्या प्रमाणेच सेवा दिली जाईल. या प्लॅटफॉर्मवर दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी चालक नोंदणी करू शकतात. सहकारावर आधारीत टॅक्सी सर्व्हिसमध्ये दुचाकी, कार आणि रिक्षा या वाहनांचे रजिस्ट्रेशन करता येईल.
काही महिन्यांतच सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म लाँच करण्यात येईल. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळणारा नफा थेट ड्रायव्हरना मिळेल. योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात येईल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, सरकारच्या या घोषणेनंतर ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या खासगी सेवा पुरवठादारांची झोप उडाली आहे.
या क्षेत्रात सरकारी यंत्रणाच उतरणार असल्याने स्पर्धा वाढणार आहे. ग्राहकांना आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. कमी किंमतीत ऑनलाइन टॅक्सी सर्व्हिस मिळेल. सरकारने स्पष्ट केले आहे की याद्वारे मिळणारा सगळा नफा चालकांना दिला जाईल. परंतु, ओला उबर यांच्याकडील ड्रायव्हर्सना त्यांच्या कमाईतील एक हिस्सा या कंपन्यांना द्यावा लागतो.
सहकारिता आधारीत सर्वात मोठी विमा कंपनी सुरू करण्याचीही घोषणा सरकारने केली आहे. यामुळे खासगी विमा कंपन्यांत अस्वस्थता पसरली आहे. पुढील काही महिन्यात या दोन्ही योजना कार्यान्वित होतील अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. त्यांच्या या घोषणेनंतर खासगी कॅब बुकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
होम लोन, कार लोन, पर्सनल लोनचे दर कमी होण्याच्या मार्गावर; RBI लवकरच घेणार मोठा निर्णय