काँग्रेस नेते कन्हैया कुमारांना मारहाण, शाईही फेकली, जाणून घ्या नेमकं घडलं काय ?
Kanhaiya Kumar : काँग्रेस (Congress) नेते आणि ईशान्य दिल्लीतील उमेदवार कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांना प्रचारादरम्यान मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने जवळ येऊन कन्हैया कुमार यांना मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांच्यावर शाईही फेकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आज काँग्रेस नेते दिल्लीतील ब्रह्मपुरी भागात लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) प्रचार करत होते. यावेळी अनेक लोक घोषणाबाजी करत कन्हैया कुमारच्या जवळ आले. यातील एक व्यक्ती पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने त्याच्या अगदी जवळ येत त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणात आम आदमी पार्टीच्या (AAP) नगरसेवक छाया शर्मा (Chhaya Sharma) यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, जेव्हा ती कन्हैयाला सोडण्यासाठी बाहेर आली तेव्हा काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
… म्हणून माघार घेतली, छगन भुजबळांचा मोठा खुलासा, सांगितली पडद्या मागची गोष्ट
छायाने सांगितले की, जेव्हा तिने कन्हैयाला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्यासोबतही हल्लेखोरांनी गैरवर्तन केले. तर दुसरीकडे कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला जबर मारहाण करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. ईशान्य दिल्लीमध्ये कन्हैया कुमार यांची लढत भाजपचे दोन वेळा खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्याशी होत आहे.
उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, म्हणाले, महाराष्ट्र्र तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही…