Rahul Gandhi: ‘ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स; राहुल गांधींचं ट्वीट, वायकरांच्या बातमीचं जोडलं कात्रण

Rahul Gandhi: ‘ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स; राहुल गांधींचं ट्वीट, वायकरांच्या बातमीचं जोडलं कात्रण

EVM Machine : ईव्हीएम मशीनबद्दल कायम संशयाचं वातावरण राहीलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतरही आणि अगोदरही हे वातावरण कायम आहे. आज काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनबद्दल संका उपस्थित केली आहे. (Rahul Gandhi)”भारतात ईव्हीएम मशीन हे ब्लॅक बॉक्स सारखे असून त्याच्या तपासणीची परवानगी नाही”, असं म्हणत राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशिनवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. (EVM) मुंबईतील शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याने मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर केला होता. यासंदर्भातील बातमीचं कात्रणही राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडीया पोस्टमध्ये जोडलं आहे.

रि—पोस्ट फालतूचे सल्ले देऊ नका, फक्त गाड्या बनवण्याचं काम करा; मस्कला भिडला अजितदादा गटाचा नेता

टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर केला जाऊ नये असं म्हटलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमबद्दल चर्चा सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन रद्दबातल करण्याची गरज आहे. हे मशीन एकतर मानवाद्वारे अथवा कृत्रिम बुध्दीमत्तेद्वारे हॅक केलं जाण्याची शक्यता आहे. अर्थात हा धोका कमी असला तरी त्याची शक्यता जास्त असल्याचंही मस्क आपल्या सोशल मीडीया संदेशात म्हटले आहेत. हाच संदेश राहुल गांधी यांनी रि—पोस्ट केला आहे.

फसवणुकीची शक्यता जास्त

यामध्ये राहुल गांधी म्हणतात, भारतात ईव्हीएम मशीन हे ब्लॅक बॉक्ससारखं आहे. त्याच्या तपासणीची परवानगी नाही. देशाच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शतेच्या अनुषंगाने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांचं उत्तरदायित्व कमी होतं, तेव्हा हा एक देखावा बनून राहतो आणि फसवणुकीची शक्यता जास्त राहते अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

बातमीचं कात्रण वायकरांच्या मेहुण्याकडील फोन ईव्हीएमशी जोडलेला; निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट

शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून 48 मतांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला. त्यानंतर मतमोजणी दरम्यान गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप कीर्तीकर यांनी केला होता. दरम्यान, मतमोजणीच्या दिवशी वायकर यांचा मेव्हणा मंगेश पंडीलकर याने मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. यासंदर्भात एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीचं कात्रण राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये जोडलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज