भाजपमध्ये आयारामांना मानाचं पान; बाहेरुन आलेले एवढे नेते झाले मंत्री, मुख्यमंत्री अन् प्रदेशाध्यक्ष

भाजपमध्ये आयारामांना मानाचं पान; बाहेरुन आलेले एवढे नेते झाले मंत्री, मुख्यमंत्री अन् प्रदेशाध्यक्ष

Congress Leaders Join BJP :  केंद्रात आणि अनेक राज्यांत सत्तेत असलेल्या भाजपमध्ये पक्षांतर करणाऱ्यांचा प्रभाव वाढत आहे. गेल्या 9 वर्षांत अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एवढेच नाही तर भाजपमध्ये आल्यावर त्यांना मानाचे पान वाढण्यात आल्याचे देखील दिसून आले आहे.  त्याचा प्रत्यय नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या यादीतही दिसून आला. पक्षाने 4 पैकी 3 राज्यांतील संघटनेची कमान इतर पक्षातून आलेल्या नेत्यांकडे सोपवली आहे. पण यामुळे बाहेरुन आलेले नेते तुपाशी मुळ भाजपचे नेतेच उपाशी असल्याचे बोलले जात आहे.

पंजाब आणि आंध्र प्रदेशात काँग्रेसमधून आलेल्या सुनील जाखड आणि डी पुरंदेश्वरी यांना प्रदेशशाध्यक्ष बनवण्यात आले आहे, तर झारखंड मुक्ती मोर्चातून आलेल्या बाबूलाल मरांडी यांच्याकडे झारखंडची कमान सोपवण्यात आली आहे. तिन्ही राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण जागांपैकी 50 पेक्षा जास्त जागा आहेत.

केवळ संघटनाच नव्हे, तर केंद्रातील मंत्रिपदापासून ते राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिपदावर मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून आलेले नेते विराजमान आहेत. पश्चिम बंगालमध्ये, भाजपचे विरोधी पक्षनेते असलेले शुभेंदू अधिकारी हे 2021 च्या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल सरकारमध्ये मंत्री होते.

‘आमदारांंच्या कोटाची साईज बदलली, तरीही मंत्रीपद नाही’; राऊतांची खोचक टीका

हिमंता बिस्वा सरमा- 2002-15 मध्ये आसाममधील तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेले हिमंता बिस्वा सरमा यांनी 2015 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सोडताना राहुल गांधींना भेटायला आल्यावर त्यांचे ऐकण्याऐवजी राहुल कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर भाजपमध्ये ते मंत्री झाले व सध्या ते आसामचे मुख्यमंत्री आहे. यासह मणिपुरचे मुख्यमंत्री एन .बीरेन सिंह, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सााह, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे सर्व जण पुर्वाश्रमीचे काँग्रेसी नेते आहेत.

हिंदी हार्टलँड असलेल्या बिहार आणि झारखंडमध्ये भाजप दीर्घकाळ सत्तेवर राहिला. असे असतानाही संघटनेचा कल पक्षांतर करणाऱ्यांकडे आहे. झारखंडमध्ये भाजपने बाबूलाल मरांडी यांना अध्यक्ष केले आहे. मरांडी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपमधून केली असली तरी, 2006 मध्ये त्यांनी हायकमांडशी मतभेद झाल्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला. 2009 मध्ये मरांडी यांच्या पक्षाने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली, पण त्यांना यश मिळाले नाही.

दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु पण.., प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान…

बिहारबद्दल बोलायचे झाले तर याच वर्षी मार्चमध्ये भाजपने सम्राट चौधरी यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत चौधरी यांनी भाजपपूर्वी आरजेडी, जेडीयू आणि एचएएम (से) मध्ये काम केले आहे. तसेच भाजपने आंध्र प्रदेशची कमान डी पुरंदेश्वरी यांच्याकडे आणि पंजाबची कमान सुनील जाखड यांच्याकडे सोपवली आहे. दोघेही जण काँग्रेसचे दिग्गज नेते होते. सुनील जाखड हे २०२१ पूर्वी पंजाब काँग्रेसचे प्रमुख होते. ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जवळचे मानले जात होते. तर पुरंदेश्वरी मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री होत्या. आंध्र विभाजनाबाबत त्यांनी राजीनामा दिला होता.

यासह नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि इतर पक्षांतून आलेले राव इंद्रजित सिंग यांचे केंद्रीय मंत्रिमंडळावर वर्चस्व कायम आहे. त्याचप्रमाणे भाजपशासित मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात इतर पक्षातून आलेल्यांना मोठी खाती मिळाली आहेत. महाराष्ट्रात भाजपमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित या काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना महत्वाची खाती देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भाजपाच्या गोटात का शिरले?; राऊतांनी केला ‘त्या’ घोटाळ्यांचा खुलासा

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने नॅशनल इलेक्शन वॉचच्या सहकार्याने 2014 ते 2021 पर्यंत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या डेटाचे विश्लेषण केले. एडीआरनुसार, या 7 वर्षांत 1133 नेत्यांनी पक्ष बदलले. त्यापैकी सर्वाधिक 399 काँग्रेस आणि बसपच्या 173 नेत्यांनी पक्ष सोडला. एडीआरच्या म्हणण्यानुसार, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचे संपूर्ण युनिट पक्षांतर करून दुसऱ्या पक्षात सामील झाले. एडीआरच्या या अहवालानुसार भाजप हा पक्षांतर करणाऱ्यांचा सर्वात आवडता पक्ष आहे. याचे कारण केंद्र सरकार हे आहे. 2014 ते 2021 पर्यंत खासदार-आमदार असलेले 426 नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये 253 आमदार पातळीवरील नेते आणि 173 खासदार पातळीवरील नेत्यांचा समावेश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube