दिल्ली बॉम्बस्फोट : ‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्याच्या शौर्याने जैशचं कंबरडं मोडलं अन् डॉक्टर टेरर मॉड्यूल उध्वस्त केलं

GV Sandeep Chakraborty IPS officer च्या शौर्याचं कौतुक होत आहे. कारण त्यांनी या घटनेचा काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये तात्काळ तपास केला.

IPS Officer

Delhi blasts: Dr. GV Sandeep Chakraborty IPS officer’s bravery broke the back of Jaish and destroyed the Doctor Terror module : देशाची राजधानी दिल्लीच्या सर्वात सुरक्षित मानला जाणाऱ्या भागामध्ये भयावह बॉम्बस्फोट झाला ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या स्फोटामध्ये अनेक जण गंभीर जखमी आहेत. हा स्फोट ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या जवळ झाला. हा भाग दिल्लीतील सर्वात सुरक्षा असलेला भाग मानला जातो. त्याच बरोबर डॉक्टरांच्या टेरर मॉड्यूलचा देखील यामध्ये खुलासा झाला आहे. काही डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कारवाई सुरू आहे. मात्र या दरम्यान एका सीनियर आयपीएस ऑफिसरच्या नेतृत्व आणि शौर्याचं सर्वांकडून कौतुक होत आहे. कारण या आयपीएस अधिकाऱ्याने एक सामान्य दिसणारी घटना सामान्य न मानता तिला इंटरस्टेट टेरर मॉड्यूल म्हणून तपास केला. त्यासाठी काश्मीरपासून हरियाणा उत्तर प्रदेश मध्ये तात्काळ तात्काळ छापेमारी करत तीन हजार किलो स्फोटकं ताब्यात घेतले. हे आयपीएस अधिकारी सध्या श्रीनगरचे एसएसपी असून त्यांचं नाव डॉक्टर जीवी संदीप चक्रवर्ती असं आहे.

मृताच्या नावाने 750 कोटींची शासकीय जमीन 33 कोटींमध्ये विकली; पुण्यात आणखी मोठा जमीन घोटाळा समोर

दिल्लीतील स्फोटाअगोदर हरियाणा आणि जम्मू-कश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. यामध्ये जवळपास 3000 हजार किलोस्फोटकं आणि अनेक अत्याधुनिक हत्यारं जप्त करण्यात आले या ऑपरेशन मागे ज्या अधिकाऱ्याची रणनीती आणि शौर्य होतं. ज्यामुळे हा मोठा जनसंहार होता होता राहिला. याचे पाळंमुळं कश्मीरच्या श्रीनगरमधील नौगाम भागातील जै-ए- मोहम्मदच्या धमकीच्या पोस्टरमध्ये मिळतात. अनेक लोकांना ही घटना साधारण वाटली. मात्र चक्रवर्ती यांनी या पोस्टरला गांभीर्याने घेत एखाद्या दुर्घटनेचा संकेत मानलं. तसा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयस्पद हालचालींवर नजर ठेवली. या हल्ल्यामध्ये पकडले गेलेले डॉक्टर अगोदर दगडफेकीमध्ये सापडले होते. या हल्ल्याचे नेटवर्क कश्मीरपासून हरियाणा आणि उत्तर प्रदेश पर्यंत पसरलेलं होतं.

फरीदाबादमध्ये डॉक्टरांचे टेरर मॉड्यूल

संदीप चक्रवर्ती यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेल्या तपासा दरम्यान फरीदाबादमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले तीन कश्मीरी युवक दहशतवादी संघटनेशी जोडलेले होते. छापेमारी करताना त्यांच्या ठिकाणाहून 2921 किलो स्फोटक जप्त करण्यात आली आहेत. सिरीजच्या रायफल तब्येत घेण्यात आल्या. तपासामध्ये कळालं की, ते पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांच्या संपर्कात होते आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यांचा हल्ला करण्याचा कट होता.

अल्पसंख्याक बहुल भागांच्या दोन कोटीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता: आमदार आशुतोष काळे

चक्रवर्ती यांच्या बद्दल सांगायचं झालं तर ते आंध्र प्रदेशच्या कुर्नुल या ठिकाणचे आहेत. 2010 मध्ये त्यांनी कुर्नुल मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस केले. एक वर्ष डॉक्टर म्हणून सेवा केल्यानंतर त्यांनी जनसेवेचा मार्ग निवडला. 2014 मध्ये त्यांनी भारतीय पोलीस सेवा जॉईन केली. मेडिकल पार्श्वभूमीवरून आल्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात देखील मानवी दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला. जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी उरी, सोपोर, बारामुल्ला हंडवाडा, कुपवाडा अनंतनाग यासारख्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये सेवा दिली. एप्रिल 2015 मध्ये त्यांना श्रीनगर येथे एसएसपी म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी त्यांनी दहशतवादावर नियंत्रण आणि नागरिकांचा विश्वास जिंकणे हे दोन लक्ष साध्य केले.

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, वाहनांनी घेतला पेट

संदीप चक्रवर्ती यांचे सहकारी त्यांना ऑपरेशन स्पेशलिस्ट म्हणतात. ते तांत्रिक विश्लेषण आणि माननीय दृष्टिकोन यांचा अद्भुत मेळ घालून काम करतात. नौगाव पोस्टरमध्ये त्यांनी स्वतः नेतृत्व केलं. ज्यामध्ये आंतरराज्य दहशतवादी नेटवर्कचा पडदा फाश झाला. हे शक्य झालं आधुनिक पोलीस टेक्निक डिजिटल साक्ष आहे. राज्यातील समन्वयामुळे डॉक्टर चक्रवर्ती यांना आतापर्यंत सहा वेळा राष्ट्रपती विरता पदक मिळाले आहेत काश्मीर पोलीस वीरता पदक चार वेळा आणि भारतीय सैन्य प्रमुखांकडून प्रशस्तीपत्र देखील मिळाले आहे.

follow us