काय मोदींनी थकवला वाहतूक दंड?; थकवलेल्या दंडाची पोस्ट चर्चेत, स्क्रीनशॉट व्हायरल…

काय मोदींनी थकवला वाहतूक दंड?; थकवलेल्या दंडाची पोस्ट चर्चेत, स्क्रीनशॉट व्हायरल…

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) कारचा वाहन कर थकल्याची चर्चा सोशल मीडियावर (Social Media) सुरू आहे. आर्यन सिंह (X-@iamAryan_17) नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा दावा करण्यात आला आहे. आर्यन सिंहने एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की ‘प्रिय नरेंद्र मोदीजी, तुमच्या वाहनावर (DL2CAX2964) वाहन कराची तीन चलने थकीत आहेत. कृपया वेळेवर थकीत चलने भरा आणि येथून पुढे असे नियमांचे उल्लंघन टाळा.’

आर्यन सिंह याने आपल्या पोस्टबरोबर एक फोटोही शेअर केला आहे. यात नरेंद्र मोदी टोयोटा लँडक्रूजरमध्ये बसलेले दिसत आहेत. सोशल मीडियावर या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे. काही लोक या थकबाकीवर आश्चर्य व्यक्त करत आहेत तर काही लोक यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. इन्स्टाग्रामवरही यासंबंधातील मीम्स शेअर केले जात आहेत.

आर्यन सिंहने आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालय (@PMOIndia), गृह मंत्रालय (@HMOIndia), वाहतूक पोलीसांच्या (@dtptraffic) अधिकृत हँडल्सना टॅग केले आहे. या पोस्टमध्ये ट्रॅफिक उल्लंघन ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मचाही स्क्रिनशॉट होता. यानंतर आर्यन सिंहने संबंधित वाहन पंतप्रधान किंवा त्यांच्या ताफ्यातील होते का याचा खुलासा केलेला नाही. परंतु टॅग केलेल्या हँडल्समुळे त्याच्या ट्विटची चर्चा होऊ लागली आहे.

बांग्लादेश रडारवर! गंगा पाणी करारात बदल तर होणारच; मोदी सरकाचा प्लॅन नेमका काय?

पोस्ट व्हायरल, लोकांकडून कौतुक

आर्यन सिंह याची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक युजर्स त्याचं कौतुक करत आहेत. तर काही जणांनी मात्र ही कार खरंच पंतप्रधान मोदी किंवा एखादा वरिष्ठ अधिकारी वापरत होता का असा प्रश्न विचारला आहे. काही लोकांनी चिंता व्यक्त केली की सार्वजनिक सेवेशी संबंधित वाहने दंड भरण्यात अपयशी ठरतात तर त्याचा वेगळाच संदेश समाजात जातो. एका युजरने म्हटले की नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. सर्वसामान्य नागरिक असो किंवा सरकारी कार नियमांचं उल्लंघन झालं तर दंड झालाच पाहिजे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube