माजी केंद्रीय अर्थमंत्र्याच्या मुलाची 11 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 19T123850.634

Karti Chidambaram :  आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंग प्रकरणामध्ये ईडीने मोठी कारवाई केली आहे. देशाचे माजी अर्थ व गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याची 11 लाख 4 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. तसेच पीएमएलए कायद्यांदर्गत कार्ती चिदंबरम यांच्यावर प्रोव्हिजनल ऑर्डर जारी करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम हे तामिळनाडूमधील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांना दोन्हीकडून सीबीआय व ईडी या दोन्हींकडून आयएनएक्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. ईडीने 2017 मध्ये आयनएनएक्स मीडिया ग्रुपला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची मंजुरी देण्यात कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी पीएमएलअंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदवला होता.

Madhuri Dixit: माधुरी, मुंबई अन् वडापाव; Appleचे सीईओ टीम कुकनेही मारला प्लेटवर ताव

ED ने 2017 मध्ये INX मीडिया ग्रुपला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड (FIPB) क्लिअरन्स देण्याच्या कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी PMLA अंतर्गत फौजदारी खटला नोंदवला होता. पी चिदंबरम तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना INX मीडियाला 2007-08 मध्ये FIPB कडून (फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड) मंजूरी मिळाली होती.

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

असा आरोप आहे की ही मंजुरी कायदेशीर नव्हती. पी चिदंबरम यांच्यावर आपला मुलगा कार्तीच्या माध्यमातून मीडिया समुहाचे प्रमोटर इंद्राणी व पीटर मुखर्जी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर FIPB ला 2017मध्ये मोदी सरकारने संपुष्टात आणले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube