एलन मस्कची कंपनी एक्सकडून भारत सरकारवर खटला दाखल, पण नेमकं प्रकरण काय?

Elon Musk’s Company X files case against the Indian government : अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेली कंपनी एक्सने भारत सरकार विरुद्ध कर्नाटक उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. यामध्ये एक्सने बेकायदेशीर कन्टेन्ट आणि अनियंत्रित सेन्सरशिपला आव्हान दिले आहे.दरम्यान भारत सरकार देखील अपशब्द आणि चुकीची भाषा शैली वापरल्यावर मस्क यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट बॉक्स ग्रोक वर चौकशी लावण्याच्या तयारीत आहे.
काट्याचा नायटा कराल तर तुमच्यावरच बुमरॅंग होईल; दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक
दरम्यान एक्सने केलेल्या खटल्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, केंद्र सरकार हे माहिती आणि तंत्रज्ञान कायद्या चा दुरुपयोग करून एक्सवरील मजकूर रोखत आहे यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने 2015 साली श्रेयसिंहल खटल्यामध्ये कोणत्याही सोशल मीडियावरील कंटेंट हा केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच हटवता येईल.
घोषणा लिहीलेले टी शर्ट अन् संसदेचं कामकाज झालं ठप्प; सभागृहात नेमकं काय घडलं?
एक्सने आरोप करताना म्हटले की, सहयोग नावाच्या पोर्टलद्वारे सरकारने अशा प्रकारे कंटेंट रोखण्याची अवैध प्रणाली तयार केले. त्याचा वापर करून राज्य सरकारने पोलीस हे कंटेंट हटवण्याचे आदेश देऊ शकतात. त्यामुळे कोणताही कायदा आम्हाला या प्रकारच्या पोर्टलमध्ये सहभागी होण्याचं बंधन लागू शकत नाही. तसेच वादग्रस्त कन्टेन्ट त्याचबरोबर कोणत्याही गोष्टींचा उल्लंघन होणार नाही. यासाठी आम्ही अगोदरच अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे असेही यावेळी एक्स कडून म्हटलं गेलं आहे.