ED ची मोठी कारवाई! हरयाणातील काँग्रेस आमदाराला बेड्या; राज्यात उडाली खळबळ

ED ची मोठी कारवाई! हरयाणातील काँग्रेस आमदाराला बेड्या; राज्यात उडाली खळबळ

ED Action in Haryana : हरयाणात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर (ED Action in Haryana) आलेल्या असतानाच केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे. आताही ईडीने हरयाणात मोठी (Haryana Politics) कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने आज शनिवारी सोनीपत येथील काँग्रेस आमदार (Congress Party) सुरेंद्र पंवार यांना अटक केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईडीने अवैध खोदकामाच्या प्रकरणात ही कारवाई केली आहे. या अटकेनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक त्यांना अंबाला येथील कार्यालयात घेऊन गेले आहे.

लोकसभेत भोपळा, तरीही काँग्रेसचा हात सोडला; हरयाणात ‘आप’चा रिस्की डाव

अवैधपणे खोदकाम प्रकरणात ईडीने आमदार सुरेंद्र पंवार आणि यमुनानगरचे माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. या ठिकाणी काही महत्वाचे पुरावे ईडीला सापडले होते. या पुराव्यांच्या आधारे ईडीने पुढील कारवाई करत आमदार पंवार यांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. यमुनानगरमधील चारशे ते पाचशे कोटी रुपयांच्या अवैध खोदकामाशी संबंधित हे प्रकरण आहे. मागील वर्षापासून ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. हरयाणा पोलिसांनी या प्रकरणात पंवार आणि अन्य काही जणांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल केले होते.

या वर्षातील जानेवारी महिन्यात ईडीने दिलबाग सिंह, सुरेंद्र पंवार आणि त्यांच्या अन्य साथीदारांशी संबंधित जवळपास वीस ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणात ईडीने दिलबाग सिंह आणि कुलविंदर सिंह यांना अटक केली होती. त्यानंतर ईडीने आणखी एक आमदाराला अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ईडीने धन शोधन अधिनियमड (पीएमएलए) 2002 च्या तरतुदींनुसार हरयाणातील फरिदाबाद, यमुनानगर, करनाल, चंडीगढ, आणि मोहाली या शहरांत 20 परिसरांत छापे टाकले होते. ही कारवाई माजी आमदार दिलबाग सिंह आणि आमदार सुरेंद्र पंवार आणि त्यांच्या अन्य साथीदारांकडून होत असलेल्या अवैध खोदकामा संदर्भात केली होती. ईडीने हरयाणा पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरू केला होता. राष्ट्रीय हरित प्राधिकरणानेही या प्रकरणात अनेक आदेश पारित केले होते.

खेळाडू अन् पैलवानांच्या राज्यात रिव्हर्स गिअर; कोणत्या मुद्द्यांनी बिघडला भाजपचा खेळ

यमुनानगर जिल्ह्यातील स्क्रिनिंग प्लँट मालक आणि स्टोन क्रशरच्या मदतीने अवैध खोदकाम आणि विक्री होत असल्याचे समोर आले. या तपासादरम्यान 5.29 कोटी रुपयांची रोकड, 1.89 कोटी रुपये किंमतीचे सोने, दोन वाहने, विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, भारत आणि विदेशातील गुंतवणुकी संदर्भातील कागदपत्रे तसेच अन्य महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube