काँग्रेसचे 99 खासदार टेन्शन फ्री! न्यायालयाने याचिका फेटाळली, जाणून घ्या सविस्तर..

काँग्रेसचे 99 खासदार टेन्शन फ्री! न्यायालयाने याचिका फेटाळली, जाणून घ्या सविस्तर..

Congress Party : केंद्रात सरकार आल्यास दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देऊ असे आश्वासन काँग्रेसने (Congress Party) लोकसभा निवडणुकीदरम्यान दिले होते. या प्रकरणी दाखल (Lok Sabha Elections) याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. खोटी आश्वासने दिली म्हणून काँग्रेसच्या सर्व 99 खासदारांना अपत्रा घोषित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

‘दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा’; अर्थसंकल्पानंतर काँग्रेस खासदाराची अजब मागणी

याचिकाकर्त्यांनी जनहित याचिका तर दाखल केली परंतु पुरेशी माहिती दिली नव्हती. या कारणामुळे उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. सामाजिक कार्यकर्त्या भारती सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. न्या. मनोजकुमार गुप्ता आणि न्या. मनीष कुमार निगम यांच्या पीठाने या याचिकेवर सुनावणी घेतली. याचिकेत पुरेशी माहिती देण्यात आली नाही म्हणून याचिका फेटाळून लावत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर याचिकार्त्यांच्या वकिलांनी याचिका मागे घेतल्याचं स्पष्ट केलं. याचिकाकर्त्यांनी सांगितले की संपूर्ण तथ्यांसह याचिका पुन्हा दाखल करण्याची इच्छा आहे. या मागणीनंतर न्यायालयाने यासाठी सूट असल्याचे सांगितले. आता यानंतर याचिकाकर्त्या भारती सिंह संपूर्ण माहितीसह पुन्हा याचिका दाखल करतात का आणि केली तर कधी दाखल करणार याची उत्सुकता आहे.

भाजप अन् काँग्रेसला सारखंच टेन्शन; हरियाणाच्या मैदानात थर्ड फॅक्टरची एन्ट्री!

लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसने केंद्रात सरकार आल्यास दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचा उल्लेख अनेक प्रचार रॅलींमध्ये करण्यात आला होता. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या भारती सिंह यांनी जनहित याचिका दाखल केली होती. काँग्रेस पक्षाची नोंदणी, निवडणूक चिन्ह आणि सर्व 99 खासदारांना अपात्र घोषित करावे तसेच त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. भारती सिंह यांनी याचिका दाखल केली. पण स्वतः बद्दल या याचिकेत कोणतीही माहिती दिली नव्हती. जनहित याचिका दाखल करताना याचिकेत संबंधित याचिकाकर्त्याचीही पूर्ण माहिती असायला हवी असे न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेसने इंडिया आघाडी (INDIA Alliance) करत लोकसभा निवडणूक लढली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे एकूण 99 खासदार निवडून आले. तर विरोधी इंडिया आघाडीतील अन्य पक्षांचे मिळून एकूण 232 जागांवर विजय मिळाला होता. आघाडीला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला नव्हता. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने 293 जागा जिंकत बहुमत मिळवले. यात एकट्या भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube