आयआयटीन बाबा अभय सिंह महाकुंभ सोडून अज्ञातस्थळी रवाना? माध्यमांसमोर येत सांगितलं सत्य…

  • Written By: Published:
आयआयटीन बाबा अभय सिंह महाकुंभ सोडून अज्ञातस्थळी रवाना? माध्यमांसमोर येत सांगितलं सत्य…

Abhey Singh : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ (Mahakumbh) मेळ्यात आयआयटी बाबा अभय सिंह (Abhay Singh) यांची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, महाकुंभ मेळा सुरू होऊन आठवडा होण्याच्या आधीच त्यांनी कुंभमेळा सोडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, आता खुद्द त्यांनीच महाकुंभ सोडून गेलेल्या बातमीचं खंडण केले. माझ्याबाबत आश्रमातील काही साधूंनी अफवा पसरवल्याचा आरोप त्यांनी केला.

SSC & HSC Board Exam : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर पहिल्यांदाच जातीचा प्रवर्ग; शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी दिले स्पष्टीकरण 

अभय सिंह जुन्या आखाड्यात मडी आश्रमातील शिबिरात राहत होते. तिथे मीडिया आणि त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी होत होती. या मीडिया अटेंशनमुळं ते त्रासले होते. त्यामुळं ते कुंभमेळा सोडून गेले, असं आश्रमातील काही साधुंनी सांगितलं.

अभय सिंग काय म्हणाले?

मात्र, इंडिया टुडेशी बोलताना अभय सिंह म्हणाले, माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मला रात्री आश्रम सोडण्यास सांगण्यात आले. त्यांना वाटले की हा फेमस झाला, जर याला काही माहिती पडले तर तो आपल्याविरोधात जाईल, असं त्यांना वाटलं. त्यामुळं ते काहीही बोलले. त्यांनी मी आश्रम सोडला आणि गुप्त साधला करायला गेलो आहे, अशी अफवा पसरवली. ते लोक बकवास करत आहेत.

‘ते सतत दारू पित असत…’

यापूर्वी जूना आखाड्यातील १६ मडी आश्रमात उपस्थित असलेल्या इतर साधूंनी अभय सिंह यांच्या मानसिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाला होते की, अभय सिंह सतत मुलाखती देत ​​होते. ते सतत मद्यधुंद असायचे आणि स्वतःला सर्वात मोठे विद्वान आणि संत मानायचे. याचा त्यांच्या मनावर परिणाम होत होता आणि त्यांनी माध्यमांना अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या योग्य नव्हत्या. पुढं साधूंनी सांगितले की, अभय सिंग यांना जुन्या आखाड्यातील आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांच्याकडे नेण्यात आले. असे म्हटले जाते की अभय सिंहची मानसिक स्थिती पाहून जुन्या आखाड्याने त्यांना आश्रम सोडण्यास सांगितल होतं आणि अभय यांनी रात्री उशिरा आश्रम सोडल्याचं ते म्हणाले.

इंग्लंडविरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, सिराजला डच्चू, तर गिलकडे उपकर्णधार पद  

‘माझा एक गुरु नाही…’

यानंतर, रात्री उशिरा, अभय सिंह यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले, माझ्या मानसिक स्थितीबद्दल कोणाला कसे कळलं? कोणतेही विज्ञान मानसिक स्थितीचा अंदाज लावू शकत नाही. तर त्यांच्या गुरूंबद्दल ते म्हणाले की, माझे फक्त एकच गुरू नाहीत. ज्यांच्याकडून मी काही शिकलो आहे, ते सर्व माझे गुरु आहेत.

दरम्यान, जुना आखाड्याचे संत सोमेश्वर पुरी यांनी दावा केला होता की ते आयआयटी बाबा उर्फ ​​अभय सिंह यांचे गुरू आहेत. सोमेश्वर पुरी यांनी सांगितले की त्यांना अभय वाराणसीमध्ये भटकताना आढळले, त्यानंतर आपण त्यांना आपल्या आश्रमात आणले. यावर अभय सिंह म्हणाले की, माझे कोणीही गुरु नाही. ज्यांच्याकडून मी शिकलो आहे, ते सर्व माझे गुरु आहेत.

दरम्यान, अभय सिंह यांनी आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. यानंतर ते कॅनडामध्ये ३६ लाख रुपये वार्षिक पगारावर काम करत होताे पण काही कारणास्तव, भारतात परतल्यानंतर, ते अध्यात्माकडे वळले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube