नऊ अड्डे अन् 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा; ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराचा खुुुलासा

नऊ अड्डे अन् 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा; ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराचा खुुुलासा

Indian Army Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या मोहिमेतील महत्वाची आणि अधिकृत माहिती आज भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोहिमेत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले. या एअर स्ट्राइकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. तीन मोठ्या दहशतवाद्यांचाही खात्मा झाला, अशी माहिती देण्यात आली.

ऑपरेशन सिंदूरबद्दल (Operation Sindoor) माहिती देण्यासाठी आज भारतीय सैन्याच्या (Indian Army) तिन्ही दलांच्या डीजीएमओंची (Director General of Military Operations) संयु्क्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत डीजीएमओंनी ऑपरेशन सिंदूरचा उद्देश स्पष्ट केला. या मोहिमेतून काय साध्य केलं. पाकिस्तानात काय उद्धवस्त झालं याची माहिती पुराव्यानिशी देण्यात आली.

या मोहिमेत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी स्थळांना निश्चित करण्यात आले होते. दहशतवाद्यांचे नेटवर्क नष्ट करणे हा उद्देश यामागे होता. भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून या टार्गेट्सची निवड करण्यात आली होती. यापैकी काही पीओकेत होते तर काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होते. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबने प्रशिक्षण घेतलेला दहशतवादी अड्डाही नष्ट करण्यात आला.

लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, 9 दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. यामध्ये युसूफ अजहर, अब्दुल मलिक रऊफ आणि मुदासिर अहमद या कुख्यात अतिरेक्यांचा समावेश होता. कंधार विमान अपहरण प्रकरणात यांचा समावेश होता. या कारवाईनंतर पाकिस्तानकडूनही कारवाई करण्यात आली. या कारवाईला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिले.

Video : पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात; भारतीय लष्कराची पत्रकार परिषद, पाहा व्हिडिओ

सरगोदा एअरबेसवरील हल्ला, पाकड्यांना धसका..

‘सारगोदा एअरबेस’वरील हल्ला पाकिस्तानसाठी अकल्पनीय आणि सर्वाधिक धक्कादायक होता. हा एअर बेस स्ट्रॅटेजीकली जगातील कठीण एयरबेसपैकी एक मानला जातो. कारण इथे पाकिस्तानची सर्वाधिक लढाऊ विमाने आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमानाद्वारे फेकण्याची अण्वस्त्रे इथेच आहेत. या विमानतळावर हल्ला करून पाकिस्तानच्या अण्वस्त्र क्षमतेला तात्पुरतं निकामी करण्यात भारताने यश मिळवलं.

पाकिस्तान कसा उद्धवस्त झाला वाचा..

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले.

तीन मोठ्या दहशतवाद्यांना मारण्यात यश मिळालं.

पाकिस्तानी सैन्यातील 35 ते 40 सैनिकांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानी ड्रोन पाडण्यासाठी गरुड स्नायपर्सचा वापर केला.

एअर स्ट्राइकसाठी एअर टी सरफेस गायडेड अॅम्यूनिशनचा वापर

पाकिस्तानातील नौदल साधन ठिकाणांवर हल्ला करण्याची सर्व तयारी नौदलाने केली होती.

भारताच्या प्रत्युत्तराने पाकिस्तान घायकुतीला आला होता त्यामुळेच पाकिस्तानने शस्त्रसंधीची विनंती केली.

पाक डिजीएमओने फोन केला होता. पाकच्या मागणीनंतर आमची चर्चा झाली : भारतीय डीजीएमओ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube