मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराकडे सापडलं होतं कोट्यावधीचं घबाड
Alamgir Alam Arrested : झारखंडचे ग्रामविकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम (Alamgir Alam) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी अटक केली. अलीकडेच आलमगीर आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरातून कोट्यवधींची रोकड ईडीकडून जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी ईडीने आज आलमगीर आलम यांना चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आलमगीर आलम यांनी ईडीच्या तपासात सहकार्य केले नाही. त्यामुळे त्यांला अटक करण्यात आली.
…म्हणूनच मोदींनी सभा टाळून रोड शोचा आग्रह केला; शरद पवार गटाची खोचक टीका
ईडी काही दिवसांपूर्वी आलमगीर आलम यांचे सचिव संजीव कुमार लाल यांचा नोकर जहांगीर आलम याच्या फ्लॅटमधून 32 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती.
त्यानंतर आलमगीर आलम यांची चौकशी करण्यासाठी त्यांनी ईडीने समन्स पाठवले होते. ईडीने आलम यांना 14 मे रोजी रांची येथील झोन कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होतं. मंगळवारी ते ईडीसमोर हजर झाले. त्यानंतर त्याची 10 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून त्यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. यानंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.
प्रज्वल रेवण्णा, महागाई अन् कांद्यावरून अमोल कोल्हेंचा मोदींवर घणाघात
पत्नी आणि मुलगीही ईडी कार्यालयात दाखल
दरम्यान, काही तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही अटकेची कारवाई केली आहे. आलमगीर आलम यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय पथक ईडी झोन कार्यालयात पोहोचले आहे. या पथकाने मंत्री आलमगीर आलम यांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यांची पत्नी आणि मुलगीही आलम यांना भेटण्यासाठी ईडी कार्यालयात पोहोचले.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीने मुख्य अभियंत्यावर १० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी छापा टाकला होता. त्यावेळी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. अभियंत्याने जबाब नोंदववतांना लाचेची रक्कम मंत्र्यांपर्यंत पोहोचवली जाते असं सांगितलं. तेव्हा आलमगीर आलम यांचे नाव पहिल्यांदाच या प्रकरणात समोर आलं होतं. आलमगीर यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचेही नाव तपासात पुढे आले आहे. आता संजीव लाल यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराकडे 37 कोटींहून अधिक रक्कम सापडली आहे.
आलमगीर आलम हे पाकुड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. ते चार वेळा निवडून आले आहेत. ते सध्या झारखंड सरकारमध्ये संसदीय कामकाज आणि ग्राममविकास मंत्री म्हणून काम करत आहे. ते यापूर्वी २० ऑक्टोबर २००६ ते १२ डिसेंबर २००९ या काळात झारखंड विधानसभेचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत.