राज्यातील 36 खासदारांना माय मराठीचा अभिमान; 12 खासदारांनी घेतली इंग्रजी अन् हिंदीतून शपथ!

  • Written By: Published:
राज्यातील 36 खासदारांना माय मराठीचा अभिमान; 12 खासदारांनी घेतली इंग्रजी अन् हिंदीतून शपथ!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांनंतर आता संसदेच्या विशेष अधिवेशनाला कालपासून (दि.24) सुरूवा झाली असून, काल आणि आज नवनिर्वाचित खासदारांच्या शपथ दिली जात आहे. त्यात आज (दि.25) नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) इंग्रजीतून शपथ घेतली. त्यांच्या या शपथतेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांमध्ये मात्र, राज्यातून निवडून गेलेल्या 48 खासदारांपैकी कोणत्या खासदाराने कोणत्या भाषेत शपथ घेतली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया. (Maharashtra New Elected MP Takes Oath In Parliament)

Video : लंकेंचं सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर; दिल्लीत जाताच फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

मराठीतून शपथ घेतलेले खासदार कोण?

शोभा बच्छाव, धुळे, बळवंत वानखेडे, अमरावती,  प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर, कल्याण काळे, जालना, वसंत चव्हाण, नांदेड, वर्षा गायकवाड, मुंबई उत्तर मध्य, शिवाजी कालगे, लातूर, छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर, छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा, मुरलीधर मोहोळ, पुणे, रक्षा खडसे, रावेर, स्मिता वाघ, जळगाव, संजय देशमुख, यवतमाळ वाशिम, नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली, संजय जाधव, परभणी, राजाभाऊ वाजे, नाशिक, संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई, अनिल देसाई, दक्षिण मध्य मुंबई, अरविंद सावंत, दक्षिण मुंबई, भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी, ओमराजे निंबाळकर, धाराशिव, अमर काळे, वर्धा, भास्कर भगरे, दिंडोरी, सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), भिवंडी,
बजरंग सोनावणे, बीड, सुप्रिया सुळे, बारामती. अमोल कोल्हे, शिरूर ,ध्यैर्यशील मोहिते पाटील, माढा, प्रतापराव जाधव, बुलढाणा, संदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर,
श्रीकांत शिंदे, कल्याण, नरेश म्हस्के, ठाणे, रवींद्र वायकर, मुंबई उत्तर पश्चिम, श्रीरंग बारणे, मावळ, धैर्यशील माने, हातकणंगले, सुनील तटकरे, रायगड.

आष्टीकरांना पुन्हा का घ्यावी लागली शपथ? महाराष्ट्रातल्या खासदारांकडून घोषणा, अध्यक्षांनी दिली समज

हिंदीतून शपथ घेतलेले खासदार कोण?

प्रणिती शिंदे, सोलापूर,गोवाल पाडवी, नंदूरबार, श्यामकुमार बर्वे, रामटेक, प्रशांत पडोले, भंडारा-गोंदिया, किरसान नामदेव, गडचिरोली-चिमूर, नारायण राणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अनुप धोत्रे, अकोला, पीयूष गोयल, उत्तर मुंबई, नितीन गडकरी, नागपूर, अपक्ष खासदार विशाल पाटील.

इंग्रजीतून शपथ घेतलेले खासदार कोण?

हेमंत सावरा पालघर, निलेश लंके, अहमदनगर.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज