मुंबई – पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठविली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही शनिवारी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ‘रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध होता. पत्रकार वारिसे यांची हत्या झाली. हे प्रकरण खूप […]
नाशिक : पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आणि राज्यात आगामी काळात स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये (nashik) २ दिवसांपासून भाजपचं बैठक सुरू आहे. मागील काळात काय रणनीती असावी, यावर सध्या चर्चा सुरू आहे. आजच्या या बैठकीत भाजप (bjp) आणि शिंदे गटाचा (Shinde group) राज्यात २०० चा नारा राहणार आहे. भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ (Punyashlok Ahilya Devi Holkar Nagar) असे करावे या मागणीसाठी ‘नामांतर रथयात्रा’ (Naamantar Rath Yatra) काढण्यात आली आहे. या यात्रे दरम्यान आता राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करण्याला पाठिंबा दिला आहे. यावेळी लंके म्हणाले, ‘तुम्ही पद यात्रा सुरू केली. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद, […]
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे साईज्योती बचतगटांचे प्रदर्शन आजपासून न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू झाले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडले. या प्रदर्शनात कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन यांचाही यंदा समावेश करण्यात आला आहे. १२ कोटींचा रेडा मात्र हरियाणा येथील दारा नावाचा १२ कोटी रुपयांचा रेडा हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण […]
मुंबई : महाराष्ट्रात सहकारी संस्था काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी अनेक वर्षांच्या मेहनत व परिश्रमाने उभ्या केल्या आहेत. भाजपाला हेच खूपत असल्याने आता केवळ भाजपा जिल्हाध्यक्षांच्या शिफारसीवरच सहकारी संस्थांची नोंदणी देऊ असा फतवा सहकारमंत्री अतुल सावे यांनी काढला आहे. सहकार मंत्र्यांचे हे वर्तन मंत्रिपदाच्या शपथेचा भंग असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अतुल सावे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन घेऊन आपला जिल्हा राज्यात तृणधान्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली. न्यू आर्टस, कॉमर्स ॲड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कृषिविभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, […]