अहमदनगर : हा महाराष्ट्र फुले-शाहु-आंबेडकरांचा ही गोष्ट आत्ताचे राज्यकर्ते आणि त्यांचे बगलबच्चे विसरले आहेत, या शेलक्या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. अजित पवार आज अहमदनगर जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन करण्यासाठी आले असता त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. पवार म्हणाले, सरकार येत असतं जात, असतं ही लोकशाहीची पध्दत आहे. […]
औरंगाबाद : पांढरं सोनं म्हणून ओळख असणाऱ्या कापसानं यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणलंय. औरंगाबाद जिल्ह्याच्या (Aurangabad District) अनेक भागांमध्ये दोन दिवसांत कापसाचा (Cotton) दर 300 रुपयांनी घटल्यानं शेतकरी (Farmer)संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपासून कापसाच्या भावात सातत्यानं (Cotton Price) घसरण होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरल्याचं पाहायला मिळतंय. कापसाला गतवर्षी प्रतिक्विंटल 13 हजारांचा विक्रमी भाव मिळाला […]
अहमदनगर : राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीवारी करीत आहेत, अद्याप त्यांच्याकडून काही होत नाहीये, आता आम्ही प्रकल्प दिल्लीवरुन घेऊन असं ते म्हणताहेत, यांच्यात लाथ मारुन पाणी काढण्याची धमक नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. अहमदनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, आत्तापर्यंत मोठ-मोठ्या नेत्यांचा काळ तुम्ही आम्ही पाहिलेला आहे, कोणाच्याच काळात असं फोडाफोडीचं […]
वर्धा : राजकारणी लोक साहित्यिकांची प्रेरणा आहेत. आम्ही नसलो तर साहित्यिकांना काम उरणार नाही. आमच्यात देखील साहित्यिक लोक आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून आमच्यातलं साहित्य ओसंडून वाहतं, असा मिश्किल टोला ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) व्यासपीठावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लागवला. काही लोकांना प्रश्न पडतो की साहित्याच्या व्यासपीठावर […]
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे आयोजित एका कार्यक्रमाला खासदार सुजय विखे यांची उपस्थिती होती. मात्र या कार्यक्रमातच शाब्दिक वाद झाल्याने राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. यावेळी खासदार विखे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. नगर-दौंड महामार्गाचे सगळे काम पुर्ण झाले आहे, मात्र लोणीव्यंकनाथ (ता. […]
अहमदनगर : शिवसेनेच्या बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच माजीमंत्री यादीत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवडणुकीचे आव्हान दिले होते. आता आदित्य यांच्या या आव्हानाला भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी शाब्दिक टोला लगावला आहे. अहमदनगर मध्ये बोलताना विखे म्हणाले, ज्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं त्यांच्या पिताश्रींनीही विधान […]