तुमचे तोंड कुणी शिवून टाकले आहे का? खर्गेंनी अमित शाहांना घेरत थेट राजीनामा मागितला
Mallikarjun Kharge : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधूर आणि पेलेट गन वापरण्याचे आदेश कुणी दिले? साध्या कपड्यांमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणारे लोक कोण होते?
Mallikarjun Kharge On Amit Shah : लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर झाल्यानंतर ते राज्यसभेत मांडण्यात आले आहे. त्यावर वादळी चर्चा सुरू आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी थेट गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आंदोलनातील विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, अश्रुधूराचा वापर करण्याचे आणि पेलेट गन वापरण्याचे आदेश नेमके कोणी दिले आहे. तुमचे तोंड कुणी शिवले आहे का ? असे सवालही मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केलाय.
राज्यसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. पेपर लीक प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कारवाई, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
आज सरकार फास्ट ट्रैक कोर्ट की बात करती है, लेकिन 2024 NEET पेपर लीक के मुख्य आरोपी संजीव मुखिया को क्लीन चिट मिल गई।
सरकार बड़ी-बड़ी बातें करती है, लेकिन…
2026 NEET पेपर लीक के मामले में जब कुछ दिन पहले सुनवाई होनी थी, तब पहली ही सुनवाई में CBI के वकील पेश नहीं हुए।
हालत ये… pic.twitter.com/tHSjslaEdo
— Congress (@INCIndia) July 30, 2026
एनटीएमध्ये बदल झाला नाही तर पुन्हा पेपर लीक होतील-खर्गे
व्यवस्था तीच आणि कामकाजाची पद्धतही तीच राहिली तर पेपर लीक थांबणार नाही. केवळ मंत्री बदलून उपयोग नाही. एनटीएमध्ये मूलभूत सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा काही दिवसांनी पुन्हा पेपर लीक होईल आणि आपण पुन्हा याच विषयावर संसदेत चर्चा करत बसू. पेपर लीक ही सरकारच्या अपयशाची नवी ओळख बनली आहे. पेपर लीक करणारी टोळी खुलेआम काम करत होती, पण सरकार झोपले होते. सरकारकडे गुप्तचर यंत्रणा नाही का? असा सवाल कर्गे यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि पेलेट गन वापरण्याचे आदेश कुणी दिले?
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधूर आणि पेलेट गन वापरण्याचे आदेश कुणी दिले? साध्या कपड्यांमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणारे लोक कोण होते? यामागील सूत्रधार कोण? जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नसतील, तर त्यांनी राजीनामा द्यावा. पंतप्रधानांनी त्यांच्याकडून याचा जाब विचारला पाहिजे, असे खर्गे म्हणाले.
स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जिवंत होणार…’पत्री सरकार 1942′ चे पहिले पोस्टर प्रदर्शित
तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, तुमचे तोंड कुणी शिवून टाकले आहे का ? खर्गे
विद्यार्थ्यांवर पेलेट गन चालविण्याचे व्हिडिओ पाहून आम्हाला लाज वाटली. सरकारला लाज वाटली की नाही, हे मला माहिती नाही. अनेक विद्यार्थी जखमी झाले आहे. त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आहे. तुम्ही फार काळ लपून राहू शकत नाही.
गोव्याच्या सफरीला साऊथचा तडका! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ मधील ‘वणक्कम’ प्रेक्षकांच्या भेटीला
20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आयोजित केलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा उल्लेख करत खर्गे म्हणाले, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. हे सर्व दिल्लीत घडत होते. एवढे सगळे घडूनही तुम्ही एक शब्दही बोललात नाही. तुमचे तोंड कुणी शिवून टाकले आहे का? असा उपरोधक टोला खर्गे यांनी लगावला. त्यानंतर सभागृहातील भाजप सदस्य आक्रमक झाले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आणि या विधानाला आक्षेपार्ह असल्याचे म्हटले.