Earthquake : कारगिलमध्ये भूकंप! जोरदार धक्क्यांनी लोकांची पळापळ, घरांचे नुकसान
Earthquake in Ladakh Kargil : दक्षिण आशियातील देशांत मागील काही दिवसांपासून सातत्याने भूकंप (Earthquake) होत आहे. आताही लद्दाखमधील कारगिल भागात जोरदार भूकंप झाला. या भुकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. याआधी 16 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या काही भागात भूकंप झाला होता. तसेच शुक्रवारी गुलमर्ग आणि श्रीनगर भागातही भुकंपाचे धक्के जाणवले होते. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड भागात भूकंप झाला. काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आत पाच किलोमीटर खोल होता. त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. जम्मू काश्मीर राज्यात भूकंप होण्याचे प्रमाण जास्त आहे. भूकंपाच्या दृष्टीने हे राज्य जास्त संवेदनशील मानले जाते.
China Earthquake : चीनमध्ये दुसऱ्या दिवशीही शक्तिशाली भूकंप; घरांची पडझड, नागरिकांची पळापळ
भूकंप का होतात?
पृथ्वीच्या आतील प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो. पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स एकमेकांना आदळल्यास जी ऊर्जा बाहेर पडते त्यालाच भूकंप असे म्हणतात. या प्लेट्स भूगर्भात अत्यंत कमी गतीने सरकत असतात. वर्षाच्या हिशोबात सांगायचे झाले तर या प्लेट्स दरवर्षी त्यांच्या जागेवरून 4 ते 5 मिमी सरकतात. या काळात हालचाली होताना प्लेट्स एकमेकांवर आदळण्याचे प्रकारही घडतात. असे जर झाले तर आपल्याकडे भूकंप येतो, असे तज्ज्ञ सांगतात. याआधी नेपाळ आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भूकंप झाला. येथील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. या भूकंपात मात्र कोणतेही नुकसान झाले नाही.
दरम्यान, याआधी राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात (Earthquake in Delhi) जोरदार भूकंपाचे धक्के बसले होते. अचानक झालेल्या या भूकंपाने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक भीतीने घराबाहेर पळत सुटले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेजवळ होता. या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे भारतात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नव्हती.
Earthquake : उत्तर भारतात भूकंप! दिल्लीसह पंजाब, हरयाणा हादरला, लोकांची पळापळ