पहिलं इलेक्शन अन् कंपन्याचं टायमिंग; काहींचा आजही दबदबा, काहींना लागलं टाळं

पहिलं इलेक्शन अन् कंपन्याचं टायमिंग; काहींचा आजही दबदबा, काहींना लागलं टाळं

Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू (Lok Sabha Election) आहे. सहा टप्प्यांतील मतदान झालं आहे. आता सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या (1 जून) होणार आहे. अशावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की देशात पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली होती? त्यावेळी देशाला पुढे घेऊन जाण्यात कोणत्या कंपन्यांचे योगदान होते? सात दशकांपूर्वी ज्या कंपन्यांचा दबदबा होता त्यात टाटा ब्रिटानिया पासून गोदरेज इंडस्ट्रीजपर्यंत अनेक कंपन्यांचा समावेश होता. यातील काही कंपन्या आजही अस्तित्व टिकवून आहेत आणि वेगाने प्रगती करत आहेत. काही कंपन्या मात्र काळाच्या ओघात लुप्त झाल्या आहेत.

चार महिने चालली पहिली निवडणूक

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षांच्या आता निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. मार्च 1950 मध्ये सुकुमार सेन यांना पाहिले निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आले होते. यानंतर पहिली निवडणूक 1951-52 मध्ये झाली होती. हिमाचल प्रदेशातील किन्नोर येथील रहिवासी श्याम सरन नेगी पाहिले मतदार होते. त्यावेळी लोकांना मतदानाबाबत माहिती नव्हती. त्यामुळे मतदानाचे व्हिडिओ तयार करून ते ठिकठिकाणी दाखवण्यात आले होते.

योगी आदित्यनाथांच्या गोरखपूरमध्ये घमासान! “इस बार मामला फिल्मी है”

पहिल्या निवडणुकीत जवळपास 17 कोटी लोकांनी भाग घेतला होता. यातील 85 टक्के असे लोकांना लिहिता वाचता येत नव्हते. त्यावेळी 489 इतके लोकसभा मतदारसंघ होते. रिपोर्ट्सनुसार पहिल्या निवणुकित 10 लाख रुपये खर्च आला होता. भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास खास आहे. देशात पहिली निवडणूक 1951-52 मध्ये झाली होती. यावेळी 489 मतदारसंघांसाठी 25 ऑक्टोबर 1951 या दिवशी मतदान सुरू होऊन 21 फेब्रुवारी 1952 पर्यंत सुरू राहिले. टाटा ग्रुपपासून गोदरेज ग्रुपपर्यंत भारताच्या उद्योग विश्वातील मोठ्या कंपन्या होत्या.

भारत आज जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. यामध्ये उद्योग जगतातील दिग्गज व्यक्तींचाही मोठा वाटा आहे. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून देशाला वेग देण्याचा प्रयत्न ही मंडळी करत होती. स्वातंत्र्याच्या आधीपासून जवळपास सत्तर कंपन्यांनी व्यवसायाला सुरुवात केली होती. इंग्रजांच्या काळातच यातील बऱ्याचशा कंपन्या सुरू झाल्या होत्या. आज या कंपन्या देश विदेशात विस्तारल्या आहेत.

टाटा ग्रुप देशातील सर्वात जुन्या व्यापारी घराण्यांत सहभागी आहे. अगदी रोजच्या आहारातील मीठापासून लग्जरी कार आणि विमानापर्यंतचा टप्पा गाठणारा हा उद्योग समूह 1868 मध्येच सुरू झाला होता. देशातील पहिल्या निवडणुकीपर्यंत यांचा व्यवसाय खूप वाढला होता. आजही टाटा ग्रुपचा जलवा कायम आहे. आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी टीसीएस तसेच टाटा स्टील, टाटा मोटर्स, एअर इंडिया अशा अनेक कंपन्या टाटा उद्योग समूहाची शान आहेत.

Lok Sabha : ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? निकालाकडे साऱ्यांचे लक्ष

खाद्य उद्योगातील मोठी कंपनी म्हणजे ब्रिटानिया. ही कंपनी सुद्धा 1892 मध्ये सुरू झाली होती. बिस्कीटापासून अनेक खाद्यपदार्थ या कंपनीकडून तयार केले जातात. वाडिया ग्रुप द्वारा स्थापित कंपनीची सुरुवात कोलकाता येथून करण्यात आली होती.

देशात ज्यावेळी पहिली निवडणूक झाली त्यावेळी गोदरेज कंपनी मोठ्या प्रमाणात विस्तारली होती. सन 1897 मध्ये आर्देश्वर गोदरेज आणि त्यांचे बंधू पिरोजशा गोदरेज या दोघांनी कंपनीची स्थापना केली होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी हॅवमोर कंपनीची सुरुवात सतीश चंद्र चोना यांनी सन 1944 मध्ये केली. यानंतर थोड्याच वर्षात स्वातंत्र्य मिळाले आणि फाळणी सुद्धा झाली. सतीश चंद्र यांनी आपला व्यवसाय 1951 मध्ये अहमदाबादमध्ये सुरू केला होता.

अॅटलस अन् एचएमटीला ब्रेक

पहिल्या लोकसभा निवडणुकीवेळी 1951 मध्ये जानकीदास कपूर यांनी Atlas कंपनी सुरू केली होती. पहिल्याच वर्षी तब्बल बारा हजार सायकली तयार करण्याचं रेकॉर्ड कंपनीने केलं होते. 1965 पर्यंत देशातली सर्वात मोठी सायकल कंपनी बनली होती. परंतु, आज कंपनी जवळपास बंद पडली आहे. तसेच एचएमटी कंपनीची स्थापना झाल्यानंतर एक वर्षाने 1961 मध्ये एचएमटी घड्याळांचे उत्पादन भारतात सुरू झाले. नव्वदच्या दशकात हा ब्रँड घराघरात पोहोचला होता. पण आज मात्र हा ब्रँड इतिहासजमा झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube