भाजपला दणका! निवडणुकीच्या धामधुमीत दिग्गज नेत्याच्या हाती JMM चा झेंडा
Jharkhand Elections 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीत फोडाफोडीचं (Jharkhand Elections 2024) राजकारण जोरात सुरू आहे. सर्वच पक्षांना या राजकारणाचा फटका बसत आहे. यातच आता भाजपसाठी धक्का देणारी बातमी आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रणव वर्मा यांनी (Pranav Varma) पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी झारखंड मुक्त मोर्चात प्रवेश घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या (Hemant Soren) उपस्थितीत प्रणव वर्मा यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. वर्मा यांच्या या निर्णयामुळे ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी प्रणव वर्मा यांनी आपल्या सर्व कुटुंबासह झारखंड मुक्ती मोर्चात प्रवेश केला.
भारतीय जनता पार्टीत असताना माझी सातत्याने अवहेलना झाली. त्यामुळे पक्ष सोडण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता असे प्रणव वर्मा यावेळी म्हणाले. प्रणव वर्मा कोडरमा मतदारसंघातून खासदार राहिलेले रीतलाल वर्मा यांचे पुत्र आहेत. राज्यात भाजपला स्थिरस्थावर करण्यात रीतलाल वर्मा यांचे मोठे योगदान होते. रीतलाल यांचे पक्षात मोठे वजन होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसेच भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांचे निकटवर्तीय होते.
Jharkhand Assembly Election 2024 : भाजपची यादी जाहीर, निवडणुकीसाठी स्टार प्रचारक फिक्स
पक्ष सोडल्यानंतर प्रणव वर्मा यांनी फेसबूकवर अतिशय भावूक पोस्ट केली आहे. यामध्ये भाजपातील सध्याच्या व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप आता तत्व आणि आदर्शांवर चालणारा पक्ष राहिलेला नाही अशी टीका प्रणव वर्मा यांनी केली. यानंतर आता भाजप नेत्यांकडून (Bhartiya Janata Party) काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजपाचे स्टार प्रचारक तयार
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, हिमंता बिस्वा सरमा, बाबू लाल मरांडी, अमर कुमार बौरी, लक्ष्मीकांत बाजपेयी, रवींद्र कुमार राय, धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ, मोहन यादव, स्मृती इराणी आणि नायब सिंग सैनी झारखंड निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भाजपचा प्रचार करताना दिसणार आहे.
तसेच या यादीमध्ये दिग्गजांच्या व्यतिरिक्त मोहन चरण माझी, विष्णू देव साई, अर्जुन मुंडा, नित्यानंद राय, केशव प्रसाद मौर्य, सम्राट चौधरी, अन्नपूर्णा देवी, संजय सेठ, नागेंद्र नाथ त्रिपाठी, कर्मवीर सिंग, चंपाई सोरेन, करिया मुंडा, दीपक यांचा समावेश आहे. प्रकाश, विद्युत बरन महतो, निशिकांत दुबे, धुल्लू मेहतो, सुवेंदू अधिकारी, आदित्य साहू, प्रदीप वर्मा, बालमुंकुंद सहाय, सीता सोरेन, रामचंद्र चंद्रवंशी, मनोज सिंह आणि घुरण राम यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
Jharkhand News : अबब! 15 हजार सॅलरी असणाऱ्या नोकराकडे कोट्यवधींचं घबाड; पाहा व्हिडिओ