पेपरलीक, तिसरी अर्थव्यवस्था, जम्मू काश्मीर अन् विरोधकांची घोषणाबाजी.. राष्ट्रपतींच्या भाषणात काय?

पेपरलीक, तिसरी अर्थव्यवस्था, जम्मू काश्मीर अन् विरोधकांची घोषणाबाजी.. राष्ट्रपतींच्या भाषणात काय?

Parliament Session 2024 : देशात एनडीए सरकार आल्यानंतर (NDA Government) पहिल्याच अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. खासदारांना शपथ दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (President Draupadi Murmu) सभागृहाला संबोधित केले. अभिभाषणात त्यांनी निवडून आलेल्या खासदारांना शुभेच्छा दिल्या. तसेच मागील आणि आताच्या सरकारच्या कामकाजाचं कौतुक केलं. यावेळी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित होते.

मुर्मू म्हणाल्या, देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा स्थिर सरकार आणलं आहे. लोकांनी तिसऱ्या वेळेस सरकारवर विश्वास टाकला आहे. मागील दहा वर्षांच्या काळात झालेल्या बदलांमुळे या गोष्टी साध्य झाल्या आहेत. आता सरकार जगात तिसरी अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वच क्षेत्रांना बळकट़ी देण्याचा प्रयत्न होत आहे. मागील दहा वर्षांत ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही जोर देण्यात आला.

परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणे योग्य नाही. पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष तपासणी आणि यातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याचं काम सरकार करत आहे. याआधीही काही राज्यांत अशा घटना घडल्या होत्या. या विरुद्ध पक्षीय राजकराण करू नये असे त्यांनी सांगितले. मुर्मू बोलत असतानाच विरोधकांनी मात्र जोरदार गोंधळ घातला. राष्ट्रपतींचं भाषण ऐकण्याचीही त्यांची मानसिकता दिसत नव्हती.

खरीप हंगामातील पिकांच्या एमएसपीत मोठी वाढ सरकारने केली आहे. आता ऑर्गेनिक उत्पादनांची मागणी जगभरातून वाढत आहे. या मागणी पूर्ण करण्याची भरपूर क्षमता भारतात आहे. एप्रिल 2014 मध्ये देशात फक्त 209 एअरलाइन्स होत्या त्यांची संख्या आता 605 झाली आहे. सरकारने देशातील गावागावात रस्त्यांचं जाळं विणलं असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

Parliament special session : ..म्हणून 18 अंक आहे खास; 18 व्या लोकसभेनिमित्त पंतप्रधान मोदींनी सांगितलं महत्त्व

लोकसभा निवडणुकीत देशातील 64 कोटी मतदारांनी मतदान केलं. जम्मू काश्मीरमधूनही सुखद चित्र पाहण्यास मिळालं. येथे मतदानाचं रेकॉर्डही तुटलं. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रांसफोर्सच्या संकल्पासह भारत आज जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. आता आपण पाचव्या क्रमांकावर आहोत. सन 2021 ते 2024 या काळात भारताने 8 टक्के दराने विकास केला.

सरकार मॅन्यूफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि अॅग्रीकल्चर क्षेत्रांना सारखंच महत्व देत आहे. पीएलआय स्कीम आणि ईज ऑफ डुइंग बिजनेसमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार आणि गुंतवणूक उपलब्ध होत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख 20 हजार कोटींपेक्षा जास्त निधी वितरीत करण्यात आल्याचे द्रौपदी मुर्मू यांनी स्पष्ट केले.

Loksabha Election Result : भाजप न हारले न जिंकले; 400 पारची गणितं कुठे आणि कशी चुकली?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज