अमरावती : अमेरिकेतील टेक्सास येथे घडलेल्या भीषण अपघातात आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे सर्व जण मुम्मीदिवरम मतदारसंघाचे वायएसआर काँग्रेस (YSR Congress) आमदार पी व्यंकट सतीश कुमार यांचे नातेवाईक होते. जॉर्जिया राज्यातील अटलांटा येथून ख्रिसमसच्या सुट्टीसाठीत ते टेक्सास येथील त्यांच्या नातेवाईकाच्या घरी गेले होते. […]
UGC Discontinues M.Phil Degree : विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने MPhil हा शैक्षणिक प्रोग्रॅम बंद केला असून, येथून पुढे मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही डिग्री कायमची बंद होणार आहे. जी विद्यापीठे ही पदवी देतील ती डिग्री अवैध असेल असेही युजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्याने MPhil अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन यूजीसीकडून करण्यात आले […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील विशाल राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू श्रीरामचंद्राच्या (Prabhu Shri Ram Chandra) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. दरम्यान, हे मंदिर कसे असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास जेमतेम महिना शिल्लक असताना, राम मंदिर ट्रस्टने मंदिराच्या 70 एकर परिसराचा नकाशा सादरला […]
Karnataka News : दक्षिण भारतात भाषेवरून होणारी आंदोलनं नवीन नाहीत. आताही कर्नाटकात (Karnataka) भाषेवरून जोरदार राडा झाला आहे. कन्नड भाषा समर्थकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आणि दुकानांवरील इंग्रजी भाषेतील फलकांची तोडफोड केली. हा वाद भडकण्याचं कारण म्हणजे कर्नाटकातील सर्व प्रतिष्ठानांच्या साईन बोर्डावर 60 टक्के कन्नड भाषा असावी, असे आदेश देण्यात आले होते. आज राजधानी […]
Crime : गोंडा : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गोंडा येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका नवविवाहितेने लग्नाच्या पाचव्या दिवशीच सासरच्या मंडळींना बेशुद्ध करुन लाखोंच्या मुद्देमालासह पळ काढल्याची घटना घडली आहे. शुद्धीवर आल्यावर सासरच्या मंडळींना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलील स्थानकात धाव घेतली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधे श्याम राय यांनी दिलेल्या […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर मात करण्यासाठी केंद्र सरकार आता सवलतीच्या दरात तांदूळ उपलब्ध करुन देणार आहे. 25 रुपये प्रति किलो दराने ‘भारत तांदूळ’ बाजारात येणार आहे. livemint.com ने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. यापूर्वी दिवाळीमध्ये केंद्र सरकारने भारत आटा (गव्हाचे पीठ) आणि ‘भारत डाळ’ (डाळी) या […]