अर्थव्यवस्थेची क्रमवारी सांगत मोदींनी काँग्रेसला घेरलं; म्हणाले, 11 व्या स्थानावरुन..,
Pm Narendra Modi Speech : देशाची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावर होती, तेव्हा किती गौरव करण्यात आला, आज 5 व्या स्थानावर पोहोचलीयं असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी काँग्रेसला चांगलच घेरलं आहे. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनादरम्यान, राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही, विकसित भारत, काँग्रेसची भूमिका असे सर्व मुद्दे काढत जोरदार निशाणा साधला आहे.
युनियन बॅंकेत 600 हून अधिक पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंतच करता येणार अर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 2014 साली जे अंतरिम बजेट आलं होतं तेव्हा सत्तेत कोण बसले होते ते सर्वांना माहित आहे. बजेट सादर करताना तत्कालीन अर्थमंत्र्यांनी 2044 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था सुधारणार असल्याचं म्हटलं होतं. हे विधान जगातील मोठ्या अर्थतज्ञाचं होतं. 2014 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांकडून संसदेत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला होता. आज भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचली, असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या मुलाला अटक, पीएम मोदींच्या पोस्टरला काळं फासलं
तसेच विकासामध्ये विरोधकांची महत्वाची भूमिका असते. विकास आपोआप होईल असं विरोधक तेव्हा म्हणायचे. पण त्यांचं योगदान देशाला लाभलं नाही. मागील दहा वर्षांत विविध विकासात्मक गोष्टी करुन आज देश विकासाच्या वाटेवर पोहोचला आहे. विरोधकांमध्ये आता स्वप्न बघण्याचीही हिंमत नाही संकल्प तर लांबच आहे, त्यांच्या विचारांवर दया येते मला, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
देशातल्या एकाच कुटुंबातील अनेक लोकं राजकारणात येत असतील तर काहीही गैर नाही. एकाच कुटुंबातील दोन किंवा दहा तरुणदेखील राजकारणात येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करु. मात्र, एकाच कुटुंबाने पक्ष चालवणं हे आम्हाला मान्य नाही. यासोबतच एकाच कुटुंबाभोवती पक्ष फिरणं हेही आम्हाला मान्य नाही. जे कुटुंब पक्ष चालवतो तो आपल्या सदस्याला प्राथमिकता देत असतो. ही घराणेशाही देशासाठी आणि लोकशाही धोकादायक, घातक असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं आहे.