Cipla : देशातील तिसरी सर्वात मोठी फार्मा कंपनी सिप्ला (The Chemical, Industrial & Pharmaceutical Laboratories) विकली जाणार आहे. 1.2 लाख कोटींची मार्केट कॅप असलेली ही कंपनी परदेशी कंपनीला विकली जाणार आहे. ब्लॅकस्टोन ही जगातील सर्वात मोठी इक्विटी फर्म ही कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.(indias oldest pharmaceutical company cipla promotors stake sale to blackstone Khwaja […]
Manipur Violence : मणिपुरातील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारवर घणाघाती टीका सुरुच ठेवली आहे. कोंडी करण्यासाठी संसदेत अविश्वास प्रस्तावही आणला होता. हा अविश्वास प्रस्ताव सरकारने जिंकला असला तरी या मुद्द्यावर मोदी सरकारची कोंडी होताना दिसत आहे. फक्त विरोधकच नाही तर एनडीए आघाडीतील घटकपक्षही सरकारच्या कारभारावर नाराज दिसत आहे. या असंतोषाची ठिणगी ईशान्य […]
नवी दिल्ली: फेक न्यूजबाबत (Fake news) सरकार अत्यंत सतर्क झालं आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या हालचालींवर सरकार बारीक लक्ष ठेऊन असतं. खोटी माहिती, फेक न्य़ूज पसरवल्यानं सरकारने यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातल्याच्या बातम्या आपण वाचतो. आता तर सरकार फेक न्यूजविरोधात आणखी कठोर पावले उचलत आहे. केंद्र सरकारने (Central Govt) नुकतचं एक विधेयक मांडलं. त्यातील तरतुदींनुसार फेक […]
Sudha Murthy : प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचे नाव NCERT पॅनलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात सुधारणा आणि नवीन NCERT अभ्याक्रम तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. यामध्ये सुधा मुर्ती यांच्यासह गायक शंकर महादेवन, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विबेक देबरॉय, सल्लागार समितीचे सदस्य संजीव संन्याल, आरएसएस […]
New Delhi : डॉक्टरांवरील हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (RMPs) डॉक्टरांबरोबर गैरवर्तन, मारहाण आणि हिंसाचार करणाऱ्या रुग्णांना किंवा नातेवाईकांना डॉक्टर उपचार करण्यास नकार देऊ शकतात.(Medical Commission notification issued Doctor will say, I am not doing treatment) […]
Priyanka Gandhi : मागील काही वर्षापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी राजकीय दृष्ट सक्रीय झाल्या आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, कर्नाटकमधील निवडणुकांची त्यांची त्यांच्याकडे जबाबदारी होती. यामध्ये त्यांना चांगले यश मिळाले होते. आता त्या संसदीय राजकारणात येऊ शकतात. आतापर्यत त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. सोनिया गांधी यांचे वय आणि आजारपण बघता आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक त्या […]