अदानी ग्रूपकडून (Adani Group) काल देण्यात आलेल्या ४१३ पानाच्या उत्तराला हिंडेनबर्ग रिसर्चकडून (Hindenburg Research) त्वरित प्रत्युतर देण्यात आलं आहे. अदानींच्या 413 पानांच्या उत्तरात केवळ 30 पाने आमच्या अहवालात उपस्थित केलेल्या मुद्यांवर असल्याचं हिंडेनबर्ग रिसर्चकडून सांगण्यात आलं आहे. ते पुढे म्हणाले की आम्ही विचारलेल्या ८८ प्रश्नांपैकी ६२ प्रश्रांना उत्तर देता आली नाहीत. Our Reply To Adani: […]
नवी दिल्ली : हिंडेनबर्गचा रिसर्चचा रिपोर्ट हा भारत, भारतातील संस्था, देशाची प्रगती आणि महत्त्वाकांक्षांवर पद्धतशीर केलेला हल्ला आहे, असं म्हणत अदानी ग्रुपकडून (Adani Group) हिंडेनबर्गला ऊत्तर दिले आहे. यावेळी हा अहवाल स्वतंत्र, वस्तुनिष्ठ किंवा सखोल संशोधनानंतर तयार केलेला नाही, असंही अदानी ग्रुपकडून म्हणण्यात आलं आहे. आपल्या 413 पानांच्या उत्तरात, अदानी ग्रुपने अहवालात उपस्थित केलेल्या सर्व […]
भुवनेश्वर : गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेले ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचं उपचार घेत असताना निधन झालंय. आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावर आज दुपारच्या दरम्यान, झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ गोळीबार करण्यात आला होता. गांधी चौकाजवळ दास यांच्याच सुरक्षेत असलेल्या असिस्टंट सब इन्स्पेक्टरने गोळीबार केला होता. त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार सुरु […]
भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर रविवारी दुपारी ब्रजराजनगरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या. दास यांच्या छातीत 4-5 गोळ्या लागल्या असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना विमानाने भुवनेश्वरला नेण्यात आले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, गोळीबार करणाऱ्या एएसआय गोपालदासला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे, […]
जम्मू : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा श्रीनगरच्या लाल चौकात पोहोचली. राहुल गांधी यांनी तेथे ठरल्याप्रमाणे ध्वजारोहण केले. तिरंगा फडकवताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. राहुल गांधींसोबत त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. तसेच चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. लाल चौकाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला […]
रायपूर : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल (Sant Tukaram Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Baba) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. संत तुकाराम महाराजांबद्दल त्यांनी केलेल्या विधानावर आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी दररोज मारहाण करीत होती, म्हणून त्यांनी देवाचा धावा केल्याचं […]