जातीय जनगणना होणारच! विरोधकांच्या गदारोळावर लोकसभेत अमित शहांचं वक्तव्य

मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की ही जनगणना जात जनगणनेसोबतच केली जाईल असंहीह ते यावेळी म्हणाले.

News Photo   2026 04 16T145514.285

महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून (Loksabha) संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आजपासून पुढील 2 दिवस हे विशेष अधिवेशन होणार आहे. दरम्यान, नरी शक्ती वंदन अभियान या विधेयकावर चर्चा करण्यात येणार आहे. याच चर्चेदरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत अमित शहा यांनी जनगणनेसंदर्भात भाष्य केलं आहे.

महिला आरक्षण सुधारणा विधेयकावरील लोकसभेत जनगणनेसंदर्भात अखिलेश यादव यांनी जनगणना का केली जात नाही? असा सवाल केला. त्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे. अमित शाह यांनी, मला सभागृहाच्या माध्यमातून देशातील जनतेला हे कळवायचे आहे की, जनगणनेचे काम आधीच सुरू झाले असून ते चालू आहे. असं म्हटले.

ब्रेकिंग : विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर; वाचा सविस्तर कार्यक्रम

पुढे बोलताना शाह म्हणाले, “अखिलेश म्हणाले की ते जात जनगणनेची मागणी करतील. तर त्यांना कळू द्या की सरकारने जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जनगणना जात जनगणनेसोबतच केली जात आहे. अमित शाह म्हणाले, धर्मेंद्र यादव म्हणत आहेत की त्यासाठी कोणताही रकाना नाही. त्यांना हे माहित असले पाहिजे की सध्या घरांची जनगणना केली जात आहे. घरांना कोणतीही जात नसते. जर समाजवादी पक्षाचे चालले असते, तर त्यांनी घरांची जातही निश्चित केली असती.

अखिलेश यादव खळखळून हसले. धर्मेंद्र यादव आपल्या जागेवरून उठू लागले. तेव्हा अखिलेश यांनी त्यांना खाली बसण्याचा इशारा केला. दरम्यान, शाह म्हणाले, “जेव्हा व्यक्तींची, नागरिकांची जनगणना केली जाईल, तेव्हा त्यात जातीसाठी एक रकाना समाविष्ट केला जाईल. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की ही जनगणना जात जनगणनेसोबतच केली जाईल असंहीह ते यावेळी म्हणाले.

follow us