शेअर बाजार गडगडला! एकाच दिवसांत गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी पाण्यात; काय घडलं?

Stock Market Crash : शेअर बाजारात पु्न्हा घसरणीचा सिलसिला सुरू (Stock Market) झाला आहे. खरंतर याची सुरुवात मंगळवारपासूनच झाली होती. यामुळे फक्त दोनच दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल 6.40 लाख कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ (Share Market) तेजीसह बंद झाले होते हे विशेष. यानंतर गुंतवणूकदारांना तब्बल 3.34 लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. आज बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीत 1 टक्का घसरण दिसून आली. तर सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटी नुकसान सहन करावे लागले.
बुधवारी सेन्सेक्समध्ये 700 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स 77288.50 वर बंद झाला. निफ्टीत 182 अंकांची घसरण झाल्याने तो 23486.85 वर आला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकातही मोठी घसरण झाली. स्मॉलकॅप 1.45 अंकांनी तर मिडकॅपमध्ये 0.67 अंकांचा घसरण झाली. शेअर बाजारात सध्या घसरण दिसून येत आहे. या काळात अनेकांनी नफा वसुली केली. परिणामी बाजारात घसरण झाली. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य कमी होऊन 411 लाख कोटींव आले. याआधी बाजारमूल्य 415 लाख कोटी होते. म्हणजेच गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचा फटका बसला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची भिती संपली ! भारतीय शेअर बाजारात चौथ्या दिवशी मोठी तेजी
मार्केट कॅप गुंतवणूकदारांच्या उत्पन्नाशी जोडलेला असतो. एक दिवस आधी मार्केट कॅप 4,14,94,992.3 कोटी रुपये होते. आज यात घसरण होऊन 4,11,88,539.61 कोटी रुपये इतके राहिले. याचाच अर्थ बीएसई मार्केट कॅपमध्ये तीन लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले. दुसरीकडे 24 मार्च रोजी बीएसईचे मार्केट कॅप 4,18,29,351.91 कोटी रुपये होते. यात आता 6.40 लाख कोटींची घसरण दिसून आली आहे.
मागील सात सत्रांत निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये साधारण 5.7 टक्के तेजी आली आहे. गुंतवणूकदार मात्र नफावसुली करत राहीले. यामुळे शेअर बाजारात घसरण झाली. कमी काळात व्हॅल्यूएशनमध्ये मोठी तेजी आल्याने काही व्यापारी सतर्क झाले आहेत. यामुळे शेअर्सची विक्री सुरू झाली आहे. बँकिंग, फायनान्स आणि आयटी क्षेत्रांतील शेअर्सने बाजारावर दबाव टाकला. एचडीएफसी बँक, इंफोसिस, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँकेने मिळून सेन्सेक्समध्ये 440 अंकांच्या घसरणीचे योगदान दिले.
शेअर मार्केटमधून परताव्याचे अमिष; कोट्यावधींची फसवणूक करणारा भामटा गजाआड