मोठी बातमी! ईडी-सीबीआयला झटका; दिल्ली दारू घोटाळ्यात कविता यांनाही जामीन..
Delhi Liquor Scam : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात महत्वाची (Delhi Liquor Scam) बातमी हाती आली आहे. या घोटाळ्यातील आरोपी भारत राष्ट्र समितीच्य नेत्या के. कविता यांना जामीन मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने दहा लाख रुपयांच्या बेल बाउंडवर कविता यांना जामीन दिला आहे. जामीन देताना काही अटीही घातल्या आहेत. त्यानुसार कविता यांना त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. तसेच या प्रकरणातील पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नका असेही न्यायालयाने कविता यांना बजावले आहे. न्यायालयाने याआधी आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना (Manish Sisodia) जामीन दिला होता. जामीनानंतर सिसोदिया तब्बल 18 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले. त्यांच्यानंतर न्यायालयाने कविता यांनाही जामीन मंजूर केला आहे.
आधी ईडी आता सीबीआय! BRS नेत्या के. कविता पुन्हा गजाआड; कोणत्या प्रकरणात अटक?
कविता यांना जामीन देताना न्या. बीआर गवई आणि न्या. केवी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले की मेरिटवर कोणत्याही प्रकारची टिप्पणी करण्यात आलेली नाही त्यामुळे ट्रायलवर कोणताही परिणाम होणार नाही. के. कविता मागील पाच महिन्यांपासून तुरुंगात होत्या. ईडी आणि सीबीआयने सिसोदिया आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या प्रमाणेच कविता यांचीही या घोटाळ्यात महत्वाची भूमिका असल्याचे म्हटले होते.
तपास यंत्रणांनी या जामीनाला विरोध केला. कविता यांनी फोन फॉरमॅट केला आहे. त्यांनी या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड केली आहे असे यंत्रणांनी न्यायालयात सांगितले. मात्र कविता यांनी तपास यंत्रणांचे हे आरोप नाकारले. यानंतर न्यायालयाने थेट यंत्रणांनाच सवाल केला की कविता या घोटाळ्यात सहभागी असल्याचे तुमच्याकडे काय पुरावे आहेत.
कविता यांचे वकिल मुकूल रोहतगी म्हणाले की कविता यांच्या विरोधातील दोन्ही यंत्रणांचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता त्यांना जामीन मिळाला पाहिजे. या प्रकरणात मनीष सिसोदिया यांना आधीच जामीन मंजूर झाल्याचाही मुद्दा रोहतगी यांनी उपस्थित केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कविता यांनाही जामीन मंजूर केला. कविता यांना मिळालेला हा जामीन ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांना मोठा धक्का मानला जात आहे.
इतकी ताकद सिसोदियांसाठी लावली असती तर.. स्वाती मालीवाल यांचा केजरीवालाना टोला
दरम्यान, दिल्ली मद्य घोटाळ्यात साऊथ लॉबीचाही हात होता. यात कविता यांची महत्वाची भूमिका होती. या ग्रुपमध्ये हैदराबादमधील काही व्यापारी, वायएसआर काँग्रेसचे खासदार सुद्धा सहभागी होते. ईडीने मागील वर्षी पहिल्यांदा कविता यांना समन्स बजावले होते. आम आदमी पार्टीचे संचार विभाग प्रमुख विजय नायर यांच्या संपर्कात कविता होत्या. विजय नायरला तपास यंत्रणेने दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक केली होती. यानंतर ईडीने पीएमएलएच्या कलम 3 आणि 4 नुसार मनी लाँड्रिंगच्या आरोपात कविता यांना अटक केली होती.