स्वाती मालीवाल यांना ‘आप’कडून राज्यसभेची लॉटरी, संजय सिंह तुरुंगातूनच पुन्हा खासदार होणार

स्वाती मालीवाल यांना ‘आप’कडून राज्यसभेची लॉटरी, संजय सिंह तुरुंगातूनच पुन्हा खासदार होणार

Swati Maliwal : दिल्लीतील आम आदमी पार्टीने स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना राज्यसभेची (Delhi Rajya Sabha Election) उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय तुरुंगात असलेले संजय सिंह (Sanjay Singh) पुन्हा राज्यसभेचे खासदार होणार आहेत. ‘आप’ने तिसरा उमेदवार म्हणून एनडी गुप्ता यांची निवड केली आहे. राज्यसभा खासदार म्हणून त्यांची ही दुसरी टर्म असेल.

दिल्लीतील तिन्ही राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 27 जानेवारीला संपत आहे. या जागांसाठी 19 जानेवारीला निवडणूक होणार आहे. याआधी आम आदमी पक्षाने तिन्ही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. नामांकनाची अंतिम तारीख 10 जानेवारी आहे.

AAP ने दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. याशिवाय संजय सिंह आणि एनडी गुप्ता यांना दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘आप’ने एक उमेदवार बदलला
दिल्लीतील तीनही जागांवर आम आदमी पक्षाचे वर्चस्व आहे. सध्या संजय सिंह, सुशील कुमार गुप्ता आणि एनडी गुप्ता हे राज्यसभेचे खासदार आहेत. पण पक्षाने आता सुशील गुप्ता यांच्या जागी स्वाती मालीवाल यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सुशील कुमार गुप्ता यांनी हरियाणाच्या राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली नाही.

टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूवर FIR, काय आहे नेमकं प्रकरण

संजय सिंह यांनी घेतली न्यायालयाची परवानगी
संजय सिंह कथित दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. राज्यसभेच्या अर्जावर स्वाक्षरी करता यावी, यासाठी त्यांच्या वतीने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांना यासाठी परवानगी दिली आहे.

Ship Hijacked: सोमालिया किनारपट्टीवर मालवाहू जहाज हायजॅक, क्रुमध्ये 15 भारतीयांचं अपहरण

आप तीनही जागा जिंकू शकते
यावेळीही दिल्लीतील राज्यसभेच्या तीनही जागांवर आम आदमी पक्षाचा (आप) विजय निश्चित मानला जात आहे. दिल्ली विधानसभेत 70 जागा आहेत आणि त्यापैकी 62 जागा आपकडे आहेत, तर भारतीय जनता पक्षाकडे 8 जागा आहेत. आपकडे प्रचंड बहुमत आहे. कोणताही मोठा उलटफेर न झाल्यास यावेळीही तीन जागांवर आप विजयी होऊ शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube