सत्तासंघर्षाची सुनावणी ऐकायला आले केनियाचे सरन्यायाधीश, केस समजूत सांगत चंद्रचूड म्हणाले…

  • Written By: Published:
सत्तासंघर्षाची सुनावणी ऐकायला आले केनियाचे सरन्यायाधीश, केस समजूत सांगत चंद्रचूड म्हणाले…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली. सत्तासंघर्षां वरील सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.

दरम्यान सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी ऐकायला केनियाचे सरन्यायाधीश आले होते. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाची चर्चा आता आंतराष्ट्रीय पातळीवर झाली, अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरु झाल. कोर्टाची सुनावणी सुरु झाल्यानांतर आज दुपारी कोर्टरूममध्ये केनियाच्या सरन्यायाधीश मार्था के. कूम त्यांच्या सहकारी वकिलांसोबत आज भारताच्या सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या खटल्याचं कामकाज पाहण्यासाठी आल्या. कोर्टरुममधील पहिल्या बेंचवर बसून केनियाच्या न्यायाधीशांनी कामकाज पाहिलं.

Live Blog | सत्तासंघर्षावर आजची सुनावणी संपली, दिवसभरात काय घडलं?

यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केनियाच्या सरन्यायाधीशांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत देखील केलं. तसंच केनियाचे सरन्यायाधीश मार्था के. कूम यांची ओळख करुन दिली. मार्था के. कूम या केनियाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कूम यांना महाराष्ट्राची केस समजावून सांगितली, त्यावर बोलताना ते म्हणाले की केस इतकी किचकट आहे, त्यांना समजून सांगायला माझा वेळ गेला. त्यामुळे लंच ब्रेकनंतर कोर्ट सुरु व्हायला १० मिनिटे उशीर झाला.

सुप्रीम कोर्टात सलग दोन आठवडे सुनावणी झाल्यानंतर या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. कोर्टाकडून येणाऱ्या या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे.

 

सत्तासंघर्षाच्या सुनावणीतील आजचा दिवस संपला आहे. आज शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या सकाळी पुन्हा सुनावणी सुरु होईल. उद्या सकाळी पहिल्यांदा तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडतील आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर केले जाईल. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी पुन्हा युक्तिवाद करतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube