Atique Ahmed : उमेश पाल अपहरणाचा निकाल आला; अतिक अहमदसह तिघांना जन्मठेप

Atique Ahmed : उमेश पाल अपहरणाचा निकाल आला; अतिक अहमदसह तिघांना जन्मठेप

Umesh Pal Kidnapping Case :  उमेश पाल अपहरण प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणी अतिक अहमदसह तीन दोषींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दंडही ठोठावण्यात आला आहे. आजच न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले होते. त्यानंतर आता न्यायालयाने अतिक अहमदसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात न्यायालयाने अतिक अहमद, दिनेश पासी आणि खान सौलत हनिफ यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर, अतिक अहमदचा भाऊ अश्रफसह इतर सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

2006 सालच्या उमेश पाल अपहरण केसमध्ये गँगस्टर अतीत अहमदला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.  न्यायलयाने या दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून 5000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.  काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथे उमेश पाल यांच्यावर अतीकच्या गँगने हल्ला केला होता. ज्यामध्ये उमेश पालचा मृत्यू झाला आहे. या केसमध्ये अन्य काही आरोपी फरार आहेत.

या केससाठी गँगस्टर अतीक अहमद व त्याचा भाऊ अशरफला उत्तर प्रदेश येथील प्रयागराजच्या एमपी- एमएलए कोर्टात आणले होते. ही एक हाय प्रोफाइल केस असल्याने प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी आपला फौजफाटा तैनात केला होता. अतीक अहमदला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी उमेश पाल यांच्या कुटूंबियांनी केली होती.

Cm Eknath Shinde : उद्धव ठाकरे हे राहुल गांधींच्या थोबाडीत लगावणार का?

अतीक अहमदला कालच गुजरातच्या साबरमती जेलमधून उत्तर प्रदेश येथे आणण्यात आले होते. यावेळी अतीक अहमद हा युपीच्या पोलिसांना इतका घाबरला होती की, लघवी करण्यासाठी देखील तो रस्त्याच्या मध्ये थांबला होता. काही माध्यमांनी त्याचे प्रक्षेपण देखील केले आहे. याआधी विकास दुबेचा ज्याप्रकारे एनकाउंटर करण्यात आला होता. तसाच एनकाउंटर आपला होईल अशी भिती अतिकला होती म्हणून बाजूला न जाता रस्त्याच्या मध्येच त्याने लघवी केली होती.

दरम्यान, 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल व त्याचा दोन गनर्स यांची हत्या करण्यात आली होती. उमेश पाल हा राजू पाल हत्याकांडात कोर्टात साक्षी होता. उमेश आपल्या गाडीतून उतरताच गुंडांनी त्याच्यावर फायरिंग केली होती.

निवडणुका कधीही होतील, तयार राहा ; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

उमेश पाल यांच्या हत्येचा आरोप अतीक अहमदवर लागला आहे. अतीकने साबरमतीच्या जेलमधूनच या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. अतीक अहमद हा राजूपाल हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. उमेश पाल हा राजूपाल हत्याकांडात आरोपी होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube