अजबच! कुत्रं पाळायचं असेल तर 5 हजार रुपये तयार ठेवा..सरकारी आदेशाने टेन्शन वाढणारच
Bareilly News : आजच्या दिवसांत कुत्रं पाळण खूप सामान्य गोष्ट झाली आहे. पण नंतर या कुत्र्यांचे पालन पोषण (Pet Dog) त्यांची योग्य देखभाल फार कमी लोक करू शकतात. यामुळे अनेक कुत्रे दुसऱ्यांसाठी धोकादायक होऊ शकतात. या समस्येचा विचार करता उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली महानगरपालिकेने (Bareilly News) कुत्रे पाळण्याच्या वार्षिक परवान्याचे शुल्क 50 रुपयांवरून थेट 5 हजार रुपये केले आहे. तसेच कुत्रे पाळण्यासाठी काही नवीन नियम तयार केले आहे. कुत्रे पाळण्या संबंधीच्या सुरक्षा मानकाना अधिक कठोर करण्यात आले आहे.
कुत्रे (Dog) पाळणाऱ्या लोकांसाठी हे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना दंड भरावा लागणार आहे. वेळेवर परवाना बनवून घेणे आवश्यक राहणार आहे अन्यथा यासाठी 500 रुपये विलंब शुल्क द्यावे लागेल. परवनयाचा कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च असा असेल. काही विशिष्ट प्रजातीच्या कुत्रे पालनावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये पिटबुल, रॉटविलर यांसह 23 प्रजातींचा समावेश आहे.
Rabies Day : कुत्र्याचं चावणं धोकादायकच! जाणून घ्या, रेबीज लस निर्मितीची धाडसी कथा..
पशु चिकित्सा आणि कल्याण अधिकारी डॉ. आदित्य तिवारी यांनी सांगितले की लहान आणि नॉन ब्रीडिंग कुत्र्यांसाठी 500 रुपये, मोठ्या कुत्र्यांसाठी 1000 रुपये आणि ब्रीडींगसाठी प्रत्येक कुत्र्यावर 5 हजार रुपये परवाना शुल्क आहे. पाळीव कुत्र्यांची नोंदणी बंधनकारक आहे यासाठी वार्षिक शुल्क निश्चित करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड वसूल केला जाणार आहे.
कठोर नियमांची जंत्री
महानगरपालिकेने कुत्रे पाळणाऱ्या लोकांसाठी नवीन नियम तयार केले आहेत. या नियमानुसार कुत्र्यांच्या गळ्यात मजबूत पट्टा असावा. या पत्त्यासोबत नगरपालिकेचे टोकन असेल. कुत्रे मरण पावले किंवा त्याची विक्री करायची असेल तर अशावेळी 15 दिवसांत नोंदणी करून नवीन लायसन घेणे आवश्यक राहील. कुत्र्यांचे नियमित लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. याची जबाबदारी कुत्रे मालकांची असेल. कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधूनच त्याला सार्वजनिक ठिकाणी घेऊन जाता येईल असे काही नवीन नियम महापालिकेने तयार केले आहेत. आता या नियमांचे पालन कुत्रे पाळणाऱ्या लोकांना करावेच लागणार आहे.
Uttarakhand Rain : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात 4 मजुरांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू
‘या’ प्रजातींचे कुत्रे पाळण्यास बंदी
बरेली महापालिका क्षेत्रात पिटबुल, अमेरिकन बुलडॉग, रोडेशियन रिजबॅक, साउथ रशियन शेफर्ड डॉग, रॉटविलर, पिटबुल टेरियर, वुल्फ डॉग, मॉस्को गार्ड, केन कार्सो, जपानी तोसा, अकिता, मास्टिफ, कॅनारियो, बँडडॉग या प्रजातींच्या कुत्र्यांची महापालिका नोंद करणार नाही असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना कुत्रे पाळायचे असेल तर या कुत्र्यांचा विचार करता येणार नाही.