धक्कादायक! नवजात बालकांच्या वॉर्डला भीषण आग; दहा बालकांचा होरपळून मृत्यू

धक्कादायक! नवजात बालकांच्या वॉर्डला भीषण आग; दहा बालकांचा होरपळून मृत्यू

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील झांसी येथून अतिशय धक्कादायक बातमी (Uttar Pradesh) समोर आली आहे. येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्य शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत रुग्णालयातील नवजात बालकांच्या विभागात दाखल दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग मोठी असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे. आग लागल्याचे समजताच पळापळ सुरू झाली. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक बाहेर पळू लागले. यामुळे येथे एकच धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या विभागाने 37 बालकांना सुरक्षित बाहेर काढले.

उत्तर प्रदेशात पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीची जमीन; शत्रूच्या संपत्तीची होणार विक्री..

झांसीचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांनी सांगितले की कदाचित शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असू शकते. या घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जखमींना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्‍यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि आरोग्य सचिव पार्थ सारथी सेन शर्मा रात्रीच घटनास्थळी पोहोचले होते. जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुधा सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक यांच्यास अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुधा सिंह यांनी सांगितले की जखमी झालेल्या 16 बालकांवर उपचार सुरू आहेत. या मुलांकडे बारकाईने लक्ष देण्यात येत आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना नेमकी कशी घडली. यामागे काय परिस्थिती होती, काय कारणे घडली असावीत याचा तपास केला जात आहे असे सांगण्यात आले. आग लागली त्यावेळी येथे 52 ते 54 नवजात बालके एनआयसीयू मध्ये होती. यातील दहा बालकांचा मृत्यू झाला आहे तर 16 बालकांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत अग्नितांडव! भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; झोपेतच काळाने गाठलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube