Video : ब्रिटनच्या 900 कोटींचं फायटर विमान रनवेवरुन शिफ्ट…

British F-35 Fighter Jet : ब्रिटनच्या रॉयल नेवीचं एफ-35 बी स्टेल्थ फायटर (British F-35 Fighter Jet) विमान मागील तीन आठवड्यांपासून तिरुवनंतपुरम एअरपोर्टवर खराब झाल्याने उभे करण्यात आले होते. आता या फायटर विमानाला रनवेवरुन शिफ्ट करण्यात आलं असून शिफ्टींगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राज्यात पुन्हा पावसाचा जोर! पुढील 5 दिवसांसाठी हाय अलर्ट, हवामान विभागाचा इशारा
अभियंत्यांची टीम भारतात दाखल
तिरुवनंतपुरमध्ये खराब झालेल्या फायटर विमानाची दुरुस्ती भारतातच केली जाणार की ब्रिटनला याबाबतचा निर्णय अभियंत्यांची टीम करणार आहे. ही टीम एयरबस A400M एटलस विमानाने भारतात दाखल झाली आहे. या टीमकडून विमानाची दुरुस्ती न झाल्यास विमानाला C-17 ग्लोबमास्टर सैन्य विमानाने घेऊन जाण्यात येणार आहे.
निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब तहात जिंकण्याचा प्रयत्न; भाजप नेत्यांचा ठाकरे भावांना टोला
एफ-35 या फायटर विमानाची किंमत 110 मिलियन डॉलर म्हणजेच 900 कोटी रुपयांपेक्षा अधिक असून जगातील सर्वात महाग फायटर विमानामध्ये या विमानाचं नाव अगस्थानी आहे. या विमानाचा वापर गोपनीय ठेवण्यात आला असून या विमानाच्या प्रत्येक भागाला उघडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, 2019 साली पहिल्यांदा एफ-35 विमानाच्या पंखांना हटवून C-17 विमानाने प्लोरिडातून युटाला पाठवलं होतं. या मोहिमेंतर्गत एका सुरक्षा कोडच्या आधारे पूर्ण केलं जातं.