Waqf Board Bill : ‘वक्फ बोर्डा’त एकही गैर मुस्लिमाचा समावेश होणार नाही…

Waqf Board Bill : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर (Waqf Board Bill ) संसदेत सध्या चर्चा सुरु असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या विधेयकावरुन धुमश्चक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या चर्चेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देशभरातली मुस्लिम बांधवांना एक संदेश दिलायं. वक्फ बोर्डामध्ये एकही गैर मुस्लिमाचा समावेश होणार नसल्याचा शब्दच अमित शाह यांनी यावेळी दिलायं.
Video : दादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतचं मर्यादित ठेवलयं; फडणवीसांनी संधी साधत ‘बाण’ सोडला
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, वक्फ बोर्डात एकही गैर मुस्लिम सामिल होणार नाही. वक्फ बोर्डात धार्मिक क्रिया पार पाडण्यासाठी गैर मुस्लिमाला नाही ठेवता येत. मात्र विरोधक या मुद्द्यावरुन आपली वोटबॅंक सुरक्षित ठेवण्याचं काम करीत आहे. वक्फ बोर्ड आणि वक्फ परिषदेत गैर मुस्लिम ठेवण्याचं कारण म्हणजे पारदर्शक काम सुरु आहे की नाही. संसदेतून संपूर्ण देशातील मुस्लिम बांधवांना सांगतो की वक्फ बोर्डात एकही गैर मुस्लिम सामिल होणार नसल्याचं शाह यांनी स्पष्ट केलंय.
शिट्टी वाजली रे! अमेय वाघ होस्टच्या भूमिकेत, ‘या’ तारखेपासून कॉमेडीची होणार फ्री होम डिलिव्हरी
तसेच वक्फ हा एक अरबी शब्द असून ज्याचा इतिहास काही गोष्टींशी जोडला गेला आहे. अल्लाहच्या नावावर संपत्ती दान करणे असा आज याचा अर्थ मानला जात आहे. इस्लामचे दुसरे खलिफा उमर यांच्या काळात हा शब्द अस्तित्वात आलायं. वक्फ एक प्रकारे चॅरिटेबल ट्रस्ट असून यामध्ये व्यक्ती पवित्र दान करु शकतो, असंही ते म्हणाले आहेत.