ममता बॅनर्जी सर्वात गरीब तर नायडू सर्वात श्रीमंत CM; संपत्तीचे आकडे ऐकून व्हाल थक्क!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे फक्त 15 लाख रुपयांची संपत्ती आहे.
Chief Minister Wealth Report : देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे याचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती असल्याचे या अहवालात म्हटले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुख्यमंत्र्यांकडे नेमकी किती संपत्ती आहे. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ या..
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मसनुसार (ADR Report) पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे फक्त 15 लाख रुपयांची संपत्ती आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्याकडे 931 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असून नायडू देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की प्रती मुख्यमंत्र्याची सरासरी संपत्ती 52.59 कोटी रुपये आहे. भारतात प्रती व्यक्ती शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न 2023-24 मध्ये जवळपास 1,85,854 रुपये इतके होते. तर मुख्यमंत्र्याचे सरासरी उत्पन्न 13,64,310 रुपये आहे. देशातील प्रती व्यक्ती उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण 7.3 पट आहे.
पश्चिम बंगाल : मिथून चक्रवर्तींच्या रोड शोत दगडफेक; भाजप-टीएमसी कार्यकर्ते भिडले
नायडू यांच्यानंतर कोण
देशातील 31 मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती 1630 कोटी रूपये आहे. अरुणाचल प्रदेशचे (Arunachal Pradesh) मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे 332 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. नायडू यांच्यानंतर खांडू देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. तसेच खांडू यांच्याकडे 180 कोटी रुपयांची देणी सुद्धा आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्याकडे 51 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत सिद्धरामय्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सिद्धरामय्या यांच्यावर 23 कोटी रुपये देणे आहे.
जम्मू काश्मीरचे (Jammu Kashmir) मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याकडे 55 लाख रूपये संपत्ती असून ते या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे 1.18 कोटींची संपत्ती असून ते या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
देशात फक्त दोन महिला मुख्यमंत्री
या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की 13 मुख्यमंत्र्यांनी आपल्याविरुद्ध अपराधिक प्रकरणे असल्याचे नमूद केले आहे. तर 10 मुख्यमंत्र्यांनी गंभीर अपराधिक प्रकरणे असल्याचे नमूद केले आहे. देशात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी या दोनच महिला मुख्यमंत्री आहेत. 38 वर्षांच्या अतीशी देशात सर्वात कमी वयाच्या महिला मुख्यमंत्री आहेत. तर 77 वर्षांचे पी. विजयन सर्वात वृद्ध मुख्यमंत्री आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) असे एकमेव मुख्यमंत्री आहेत जे विधानपरिषदेचे सदस्य आहेत असे या रिपोर्टमध्ये म्हंटले आहे.
Pawan Kalyan: तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; अभिनेता करणार 11 दिवस प्रायश्चित्त
मुख्यमंत्री (कंसात संपत्ती)
चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेश : 9,31,83,70,656
पेमा खांडू, अरुणाचल प्रदेश : 3,32,56,53,153
सिद्धरामय्या, कर्नाटक : 51,93,88,910
नेफ्यू रियो, नागालँड : 46,95,07,855
मोहन यादव, मध्य प्रदेश : 42,04,81,763
एन. रंगास्वामी, पुदुच्चेरी : 38,39,75,200
रेवंत रेड्डी, तेलंगाणा : 30,04,98,852
हेमंत सोरेन, झारखंड : 25,33,87,953
हिमंता बिस्वा सरमा, आसाम : 17,27,65,162
कोनराड संगमा, मेघालय : 14,06,83,315
माणिक साहा, त्रिपुरा : 13,90,29,020
देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र : 13,27,47,728
प्रमोद सावंत, गोवा : 9,37,79,584
एमके स्टॅलिन, तामिळनाडू : 8,88,75,339
भूपेंद्र पटेल, गुजरात : 8,22,80,688
सुखविंदर सुक्खू, हिमाचल प्रदेश : 7,81,89,255
पीएस तमांग, सिक्कीम : 6,69,21,255
नायब सिंग सैनी, हरयाणा : 5,80,52,714
पुष्कर सिंह धामी, उत्तराखंड : 4,64,78,080
विष्णू देव साय, छत्तीसगड : 3,80,81,550
मोहन माझी, ओडिशा : 1,97,82,315
भगवंत मान, पंजाब : 1,97,10,174
नितीश कुमार, बिहार : 1,64,82,719
योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश : 1,54,94,054
एन. बिरेन सिंह, मणिपूर : 1,47,48,361
भजनलाल शर्मा, राजस्थान : 1,46,56,666
आतिशी मार्लेना, दिल्ली : 1,41,21,663
पिनराई विजयन, केरळ : 1,18,75,766
