जगातले अजब देश! जनतेकडून घेत नाही एक रुपयाचाही टॅक्स; तरीही इकॉनॉमी स्ट्राँग..

जगातले अजब देश! जनतेकडून घेत नाही एक रुपयाचाही टॅक्स; तरीही इकॉनॉमी स्ट्राँग..

Union Budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) नेतृत्वातील एनडीए सरकार सत्तेत आहे. या सरकारकडून (NDA Government) आज बजेट सादर होणार आहे. या बजेटकडे देशाचे लक्ष (Union Budget 2024) लागले आहे. तसेच एनडीए सरकारमधील घटक पक्षही या बजेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. या बजेटमध्ये सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. या बजेटमध्ये देशातील जनतेचं सर्वाधिक लक्ष एकाच गोष्टीवर असतं ते म्हणजे कर सवलत. आताही करदाते याच गोष्टीकडे नजरा लावून बसले आहेत. याच मुद्द्याच्या अनुषंगाने आज आपण जगातल्या अशा काही देशांची माहिती घेणार आहोत जेथील सरकार जनतेकडून एक रुपयाही टॅक्स घेत नाही. कर वसूलच केला जात नसेल तर मग या देशांची अर्थव्यवस्था चालते तरी कशी असा प्रश्न पडला असेल. या प्रश्नाचंही उत्तर मिळवू या..

युएई

जगातील करमुक्त अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांच्या यादीवर नजर टाकली तर या यादीत युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरात हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. सरकारकडून देशातील जनतेकडून कोणत्याही प्रकारचा व्यक्तिगत कर आकारला जात नाही. या व्यतिरिक्त सरकार अप्रत्यक्ष कर जसे की व्हॅट आणि अन्य शुल्कांवर अवलंबून आहे. युएईची अर्थव्यवस्था कच्चे तेल आणि पर्यटनामुळे बळकट झाली आहे. या कारणांमुळे देशातील लोकांना इनकम टॅक्समधून पूर्ण सूट देण्यात आली आहे.

Budget : संध्याकाळचं बजेट सकाळी; एकाच निर्णयानं ब्रिटीशकालीन परंपरा मोडीत

बहरीन

टॅक्स फ्री देशांच्या यादीत बहरीन आहे. या देशातील नागरिकांकडून कोणताच कर वसूल केला जात नाही. देशातील सरकार सुद्धा दुबई प्रमाणेच प्रत्यक्ष कराव्यतिरिक्त अप्रत्यक्ष कर आणि शुल्कांवर अवलंबून आहे. ही पद्धत देशातील छोटे व्यवसाय आणि स्टार्टअप्ससाठी चांगली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेचाही वेग वाढतो.

कुवैत

टॅक्स फ्री देशांच्या यादीत कुवैतही आहे. येथेही कोणताही व्यक्तिगत कर सरकारकडून आकारला जात नाही. कच्चे तेलापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. देशाच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा तेलाच्या निर्यातीतून येतो. ज्यामुळे सरकारला प्रत्यक्ष कर वसूल करण्याची गरज राहत नाही. याच कारणामुळे देशातील जनतेकडून कर न घेताही कुवैतची अर्थव्यवस्था बळकट होत आहे.

सऊदी अरब

सऊदी अरबनेही देशातील जनतेला करमुक्त ठेवले आहे. तसेही सऊदी अरब सरकारला नागरिकांकडून कर घेण्याची काहीच गरज नाही. येथील लोकांना त्यांच्या उत्पन्नातील एकही रुपया कर म्हणून द्यावा लागत नाही. परंतु, या देशात अप्रत्यक्ष कर व्यवस्था मजबूत आहे. याद्वारे मिळणाऱ्या महसुलातून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. सऊदी अरब देशाची अर्थव्यवस्था जगातील समृद्ध अर्थव्यवस्थांत गणली जाते.

Union Budget: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला

ब्रुनेई

खनिज तेलाचे समृद्ध साठे असलेला देश म्हणजे ब्रुनेई. साऊथ ईस्ट एशिया खंडात हा देश स्थित आहे. या देशातील नागरिकांनाही कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. देशाच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा तेलाच्या निर्यातीतून येतो. ज्यामुळे सरकारला प्रत्यक्ष कर वसूल करण्याची गरज राहत नाही. याच कारणामुळे देशातील जनतेकडून कर न घेताही ब्रुनेईची अर्थव्यवस्था बळकट होत आहे.

द बहमास

पर्यटकांसाठी प्रथम प्राधान्य असलेला देश म्हणजे बहमास. द बहमास हा देश वेस्टर्न हेमिस्फियर भागात येतो. या देशातील नागरिकांना सुद्धा कोणताच टॅक्स द्यावा लागत नाही. या व्यतिरिक्त कॅमेन आयलैंड, ओमान, कतर आणि मोनॅको या देशांतही नागरिकांना त्यांच्या उत्पन्नावर एक रुपयाही कर द्यावा लागत नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube